संजय राऊतांच्या निवासस्थानी ईडी धाडीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली.
Ajit pawar
Ajit pawar saam tv

बीड: आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीची चौकशी अजुनही सुरू आहे. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

देशातील प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar Latest News)

Ajit pawar
Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरूच, पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय होणार परिणाम?

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले तरी ते राज्यात सगळीकडे पोहचू शकत नाहीत. आज शेतकरी संकटात आहे. असं म्हणत रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारीकरणावरून अजित पवारांनी सरकारवर निशाना साधला. ते बीडच्या परळीत नुकसानीची पाहणी दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलत होते.

राज्याच्या प्रमुखांनी ताबडतोब मंत्रिमंडळ स्थापन करावे, पालकमंत्री नेमावेत, एक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले, तरीही ते सगळीकडे पोहचू शकत नाहीत. आपले राज्य मोठ आहे, राज्यातील समस्या वेगवेगळ्या आहेत. लोकांना मदत कशी करता येईल, हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता एक महिना पूर्ण झालेला आहे, आता वाटतंय या दोन-चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Ajit pawar
Monkeypox Update : भारतातील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाबाबत आली मोठी अपडेट

अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेक वेळा नोटीस आलेल्या आहेत. त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग आयटी असेल ईडी असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल सीआयडी असेल किंवा पोलीस क्राईम ब्रँच असेल. या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही जर तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकांच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्या संदर्भात जास्त अधिकारवानीने संजय राऊत सांगतील, असंही अजित पवार म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com