अजान अन् प्रभू रामचंद्रांची आरती सुरू होताच अजित पवारांनी थांबवले भाषण, मग म्हणाले...

नाशिकमधील (Nashik) येवला येथे शिवसृष्टी भूमिपूजन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजान अन् प्रभू रामचंद्रांची आरती सुरू होताच अजित पवारांनी थांबवले भाषण, मग म्हणाले...
Ajit PawarSaam TV

नाशिक: नाशिकमधील (Nashik) येवला येथे शिवसृष्टी भूमिपूजन समारंभाच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. अजित पवारांचे भाषण सुरु असतानाच अजान आणि प्रभु रामचंद्राची आरती एकाच वेळी सुरू असल्याने काही काळ भाषण थांबवले त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. विष कालवणा-या माणसाने काय काम केल?. साधी दूध सोसायटी नाही काढली पठ्ठयाने. एक खरबूज, टरबूज सोसायटी देखील नाही. संस्था चालवण्यास डोक लागतं. धुडगूस घालण्यासाठी डोकं लागत नाही असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) खोचक टोला लगावला आहे. (Ajit Pawar Nashik Speech)

योगींनी मस्जिद आणि मंदिराचे भोंगे देखील बंद कले. साई मंदाराची आरती देखील पहाटे ६ च्या अगोदर होते. जागरण गोंधळण देखील उशिरा होते. जत्रा, ऊरूस ‌चालू आहेत. विरंगुळा म्हणुन कार्यक्रम होतात. पोलीस देखील उटसूट काही कारवाई करत नाही असे अजित पवार म्हणाले. सध्या राजकारण विचित्र दिशेने सुरू आहे. राजकीय स्वार्थ म्हणून समाजात फुट पाडण्याच काम सुरु आहे. छत्रपतींच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी केला आहे. शरद पवार फुले, शाहू, आंबेडकर तसेच छत्रपतींच्या विचाराने काम करतात. आमच्या नसानसात छत्रपती आहेत. कोण तुकडोजी आम्हाला विचारतो? भाषण म्हणजे नुसती नोटंकी. नकलाकार की भाषण करायला आले असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंवरती तोफ डागली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.