NCP कार्यालय फाेडल्याची दखल अजित पवारांनी घेतली, म्हणाले..!

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाची माेट बांधावी लागणार असल्याचे चित्र आहे.
ajit pawar
ajit pawarSaam Tv News

- राजेश भोस्तेकर

रायगड : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (ncp) कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) म्हणाले मी ताबडताेब एसपींशी संपर्क साधला. एसपींनी मला सांगितले पाच ते सहा जण हाेते. त्यांना ताब्यात घेतलं आहे. पाेलिस त्यांची चाैकशी करीत आहेत. ते काेण हाेते, काय हाेत याची माहिती पुढे येईलच. काेणत्याही निवडणुकीत यश अपयश हे असते. सगळेच निवडणुकीत जिंकतात असं ही नाही. ajit pawar on satara dcc bank election result

ajit pawar
NCP आमदाराच्या पराभवानंतर अजित पवार, शिवेंद्रराजेंचा जयजयकार

ही निवडणुक पक्षीय नव्हती. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही हे सर्वांना माहितच आहे. स्थानिक पातळीवर तेथील आमदार, खासदार असे विविध पक्षातील लाेकांनी पॅनल करुन निवडणुक लढविल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.

दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल हे केवळ सातारा नव्हेच तर राज्याच्या राजकीय क्षेत्रात धक्कादायक मानले जाताहेत. आज लागलेल्या निवडणुकांच्या निकालात राष्ट्रवादी काॅंग्रेसला धक्का बसल्याने राष्ट्रवादीचे समर्थकांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यामुळे आगामी काळात सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाची माेट बांधावी लागणार असल्याचे चित्र आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com