अजित पवारांनी पुतळ्यांवरुन पदाधिकाऱ्यांना खडसावले

अनेकवेळा हार अर्पण करावे लागल्यामुळे अजित पवार यांनी शहरात किती हे पुतळे आहेत असा सवाल केला. या पुतळ्यांवरुन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावले.
Ajit Pawar
Ajit Pawar Saam Tv

बुलडाणा: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बुलडाणा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहरातील अनेक स्थळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी असणाऱ्या पुतळ्यांना हार अर्पण केले. अनेकवेळा हार अर्पण करावे लागल्यामुळे अजित पवार यांनी शहरात किती हे पुतळे आहेत असा सवाल केला. या पुतळ्यांवरुन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी, जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा, आणि इतर ठिकाणी भेटी दरम्यान, त्यांनी शहरातील दोन ठिकाणी जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले. याचबरोबर राजवाड्यात देखील पुन्हा एक पुतळा असल्याने अजित पवार यांना पुन्हा हार अर्पण करण्यासाठी विनंती केली. यावेळी पवार यांनी थेट जिल्हाध्यक्ष नाझिर काजी आणि पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना "किती हे पुतळे" असा सवाल केला.

Ajit Pawar
आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार; राजेश टोपेंची माहिती

आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे ऐतिहासिक स्थळांच्या भेटी व आढावा घेण्यासाठी बुलडाणा दौऱ्यावर आले होते. यावेळी पवार यांची सभा सिंदखेडराजा पंचायत समिती सभागृहात बैठक झाली. यावेळी त्यांनी भेटीनंतर सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेतली. हे सभागृह इतके जीर्ण व पडके होत की, स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळेवर पाऊस आला तर पाणी आत येऊ नये म्हणून, प्लास्टिकच्या कागदाने छत झाकल्याचे दिसून आले. हे सभागृह अनेक ठिकाणी पडके असून खिडक्या तुटलेल्या दिसल्या. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची अशा पडक्या व जीर्ण सभागृहात सभा घेऊन जिल्हा प्रशासनाने उदासिनता दाखविल्याच दिसून आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com