
Political News : शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी रोहित पवारांवरून अजित पवारांवर मोठे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांमुळे पवार कुटुंबीयांसंदर्भात अनेक प्रश्न समोर येत आहेत. अशात आता अजित पवारांनी नरेश म्हस्के यांनी एका वाक्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यांनी थेट कोण नरेश म्हस्के असा प्रश्न विचारला आहे. (Rohit Pawar)
"महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकत पणाला लावली होती, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. त्यांच्या याच वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही त्यांना. असल्या फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही घरामध्ये पण असे वागत नाही. जी माझी भूमिका आहे तीच भूमिका माझी कायम असते. रोहित पवार माझ्या कुटुंबातील एक घटक आहे तो माझा पुतण्या आहे तो मला माझ्या मुलासारखा आहे, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दंगल झाली. यामध्ये दोन गटांनी एकमेकांवर दगड, चपला,काठ्यांनी हल्ला केला. या विषयी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, "मी नाशिक दौऱ्यावर होतो त्यावेळी काल मी आव्हान केलं आहे की, दंगल कोणी घडवून आणण्याचा प्रयत्न करू नये. जरी मी विरोधी पक्षात असलो तरी कसा कोणताही प्रकार होऊ देणार नाही ज्यामुळे वातावरण बिघडेल. सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करायला हवी. मी पुन्हा तमाम बांधवांना आवाहन करेल की कृपया माथी भडकवून देण्याचे काम केलं तर त्याला कोणी ही बळी पडू नका."
मी काही बोललो तर ब्रेकिंग न्यूज तयार होईल
"ही सभा महाविकास आघिडची आहे. मी एकटा याबाबत निर्णय घेत नाही इतर नेते देखील निर्णय देणार. मी काही बोललो तर ब्रेकिंग न्यूज तयार होईल कारण तिथे सगळे नेते तयारी करत आहेत. ठरलेले कार्यक्रम झाले पाहिजेत असं वाटत असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.
" राष्ट्रपती राजवट लागेल असं मला वाटतं नाही. माझी जयंत राव यांची भेट होईल. त्यांना विचारेल की काय माहिती मिळाली तुम्हाला, जयंत पाटलांच्या राष्ट्रपती राजवटीच्या मुद्दयावर अजित पवारांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.