Karnataka Election : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणा-या Car मध्ये 88 लाखांची राेकड सापडली; पाेलिस तपास सुरु

महाराष्ट्र - कर्नाटक बॉर्डर वरती कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे परिणाम दिसून येत आहेत.
Currency, solapur, karnataka election, car, police
Currency, solapur, karnataka election, car, policesaam tv

Akkalkot Police News : अक्कलकाेट पाेलिसांनी कर्नाटक राज्यात निघालेल्या एक वाहनाची तोळणूर चेकपोस्टवर तपासणी केली असताना त्यात 88 लाख रुपयांची राेकड सापडली. या रकमेबाबतचा तपशील आणि काेठे घेऊन निघाला आहात याची वाहन चालकाकडे पाेलिसांनी चाैकशी केली असता समपर्क उत्तर न मिळाल्याने पाेलिसांनी राेकड जप्त केली आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा (karnataka election) प्रचार शेवटच्या टप्प्यात आले असताना बॉर्डरवरती भलीमोठी रक्कम सापडल्याने चर्चेला उधाण आले. (Breaking Marathi News)

Currency, solapur, karnataka election, car, police
Barsu च्या दिशेने उद्धव ठाकरे रवाना, नारायण राणेंचा दाैरा रद्द; माेर्चासाठी राणे बंधू सज्ज (पाहा व्हिडिओ)

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. येत्या 10 तारखेला कर्नाटकात मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीसाठीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक बॉर्डरवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा हा कर्नाटक बॉर्डरला लागून असल्यामुळे ही खबरदारी घेतली जातं आहे. राज्यबाहेरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी पोलिसांकडून केली जातं आहे. त्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक बॉर्डर वरती कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे परिणाम दिसून येत आहेत.

Currency, solapur, karnataka election, car, police
Uddhav Thackeray To Visit Barsu Today : 'नितेश राणे कोण लागून गेला, बघितलं तर...'

दरम्यान अक्कलकोट पोलिसांनी तोळणूर चेकपोस्टवर कर्नाटकात निघालेल्या एका कारची तपासणी केली. त्यात 88 लाखांची राेकड पाेलिसांनी आढळली. कर्नाटक विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना बॉर्डरवरती भलीमोठी रक्कम सापडल्याने चर्चेला उधाण आले.

Currency, solapur, karnataka election, car, police
Deepak Kesarkar News : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे स्वप्न पूर्ण हाेणार ? शिक्षणमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण घाेषणा

ही रक्कम कशाची आहे असे पाेलिसांनी विचारताच कारच्या ड्रायव्हरने उडवाउडवीची उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांनी रक्कम जप्त करुन ट्रेझरीत पाठवली. रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी कर्नाटकात घेऊन चालले हाेते याचा तपास सुरु असल्याने अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही असे पाेलिसांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com