राज्य सरकारच्या विरोधात अकलूजकरांचे जागरण गोंधळ आंदोलन...

अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करावे या मागणीसाठी येथील‌‌ ग्रामस्थांनी राज्य सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन केले.
राज्य सरकारच्या विरोधात अकलूजकरांचे जागरण गोंधळ आंदोलन...
राज्य सरकारच्या विरोधात अकलूजकरांचे जागरण गोंधळ आंदोलन...भारत नागणे

अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करावे या मागणीसाठी येथील‌‌ ग्रामस्थांनी राज्य सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन केले. राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूजची‌ ओळख‌आहे.

आता याच ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्याची मागणी येथील भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह येथील ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे. भाजप सरकारच्या काळात अकलूज, नातेपुते व महाळूंग- श्रीपूर या तीन ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण राज्यात सत्तांतर झाल्या नंतर महाविकास आघाडी सरकारने अकलूज आणि नातेपुते या दोन ग्रामपंचायतींचा प्रस्ताव अडवून‌ ठेवल्याचा आरोप येथील भाजप नेत्यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या विरोधात अकलूजकरांचे जागरण गोंधळ आंदोलन...
मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच; तर राणे समर्थकांमध्ये जल्लोष

अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपालिका आणि नगर पंचायती मध्ये करावे या मागणीसाठी येथील‌‌ ग्रामस्थांचे मागील १९ दिवसांपासून प्रांताधिकारी ‌कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ‌देखील या मागणीसाठी स्वतः एक दिवस उपोषण केले.‌ या मागणीसाठी‌ अकलूज येथे आंदोलन सुरुच आहे.

आंदोलनाचा एक भाग म्हणून काल प्रांताधिकारी ‌कार्यालयासमोर राज्य सरकारला जाग यावी‌ म्हणून जागरण गोंधळ घालून राज्य सरकारच्या विरोधात जागर केला. दिवसभर वाघ्या मूरळी आणि संबळाच्या आवाज ने परिसर दणाणून गेला होता.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com