...म्हणून अंगणवाडी सेविकांनी प्रशासनास मोबाईल केले परत!

दाम कमी आणि काम जास्त अशीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. त्यातच कमी क्षमतेचे हे मोबाईल कामात मदत करण्याऐवजी अंगणवाडी सेविकांसाठी डोकेदुखीच जास्त ठरू लागले आहेत. त्यामुळे चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्याची मागणी करण्यात येत आहे.
...म्हणून अंगणवाडी सेविकांनी प्रशासनास मोबाईल केले परत!
...म्हणून अंगणवाडी सेविकांनी प्रशासनास मोबाईल केले परत!जयेश गावंडे

अकोला : अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामकाज व अहवाल भरण्यासाठी सरकारने मोबाइल हँडसेट पुरविले. मात्र, दोन वर्षांत काम वाढत गेले आणि मोबाइलची क्षमता कमी पडत गेली. अत्यंत कमी दर्जाचे हे मोबाईल असून त्यातच दुरुस्तीचा खर्चही परवडत नसल्याने अकोल्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी आज दोन वर्षांपूर्वी दिलेले हे मोबाइल कामांसाठी कमी अन त्रासदायकच जास्त ठरू लागल्याने अखेर अकोल्यातील प्रकल्प विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केले.

हे देखील पहा :

यावेळी अंगणवाडी सेविकानी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपल्याकडील मोबाइल परत केले. दरम्यान महिलांनी सांगितले की, सरकारी कामासाठी हे मोबाइल आम्हाला देण्यात आले होते. या मोबाइलची वॉरंटी दोन वर्षे होती, ती संपली आहे. मोबाइल अवघ्या दोन जीबी रॅमचा आहे. त्या तुलनेत लाभार्थ्यांची भरायची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाइल हँग होतात. लवकर गरम होतात. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे मोबाइल आहेत. अनेक मोबाईल हे खराब झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन हजारापासून आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.हा खर्च अंगणवाडी सेविकांकडून घेतला जात आहे.

...म्हणून अंगणवाडी सेविकांनी प्रशासनास मोबाईल केले परत!
परभणी जिल्हात पावसाचा हाहा:कार, शेती झाली स्विमिंग पूल!

राज्यभरातील सर्वच अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाच्या निषेधार्थ हे मोबाईल माघारी देण्याची मोहीम सुरु केली आहे. केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे. मात्र, सरकारने दिलेल्या मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड होत नाही. तर दुसरीकडे हे अँप इंग्लिश मध्ये असल्याने कळत नाही. त्यामुळे आम्हाला चांगले मोबाईल देऊन त्यामध्ये मराठी अँप देण्याची मागणी सेविकांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com