धक्कादायक! कोचिंग क्लासेस संचालकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे

Akola Crime News : अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग केल्याचा आरोप कोचिंग क्लासेसच्या संचालकावर आहे.
धक्कादायक! कोचिंग क्लासेस संचालकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे
police arrested choudhari class director for sexual assault with minor girlSaam tv

अकोला : अकोल्यात ( Akola ) चौधरी कोचिंग क्लासेसचा संचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग केल्याचा आरोप कोचिंग क्लासेसच्या संचालकावर आहे. वसीम चौधरी असे आरोपी संचालकाचे नाव आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी वसीम चौधरीविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अकोला परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चौधरीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे. (Akola Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी कोचिंग क्लासेसच्या संचालकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वसीम चौधरी नाव असलेल्या आरोपीवर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चॅटींग केल्याचा ठपका आहे. त्यानंतर वसीम चौधरीने पीडित मुलीला खोलीवर बोलावून अश्लील चाळे केले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी अकोल्याचा सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या जबानीवरून तक्रार नोंद केली आहे. त्यानुसार पोलिसांनी वसीम चौधरीवर भादंवि कलम ३५४ (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, १० अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने अकोल्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वसीम चौधरीला सिव्लिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी अटक केली आहे. पुढील तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलिस करीत आहेत.

police arrested choudhari class director for sexual assault with minor girl
Breaking : सोलापूर मध्ये भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू, तीन जखमी

दरम्यान, चौधरी क्लासेसच्या संचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याने अकोला परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चौधरी क्लासेसमधील विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या पालकांनी वसीम चौधरीविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकारामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट पोलिस ठाण्यात गर्दी करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वसीम चौधरीविरोधात गुन्हा दाखल आणि कठोर कारवाई करण्याचा मागणीसाठी आमदार नितीन देशमुख यांच्यासहित शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली. त्यानंतर या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com