Bacchu Kadu: राज्यमंत्री बच्चू कडूंना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिली.
Bacchu Kadu
Bacchu Kadusaam tv

अकोला : अकोला (akola) जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांना आज (बुधवार) सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन (bail) अर्ज मंजूर केला आहे. वंचित आघाडीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याबाबत एका प्रकरणावर न्यायालयात दाद मागितली हाेती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानूसार कडू यांच्यावर सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात (city kotwali police station) गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन (bacchu kadu pre arrest bail application) मिळावा यासाठी मंत्री कडू यांनी सत्र न्यायालयात (court) धाव घेतली हाेती. (bacchu kadu latest marathi news)

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा ठपका वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिली. त्यानंतर पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचितने करुन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पालकमंत्री कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

Bacchu Kadu
आत्महत्याग्रस्त पाेलीसाच्या कुटुंबाचा आयुक्तांवर राेष; कारवाईसाठी अंत्यविधी थांबवला

सत्र न्यायालयाने यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना नऊ मे पर्यंत तात्पूरता जामीन मंजूर केला. त्यावेळी न्यायालयाने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांना आजच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज अटकपुर्व जामिनावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पालकमंत्री कडू यांना अटकपुर्व जामीन मंजूर केल्याची माहिती मंत्री कडू यांचे वकील ऍड. बी. के. गांधी यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Bacchu Kadu
दुभती म्हैस, पाच बकरे जिंकण्यासाठी ५०० मल्ल आखाड्यात; नागेश राक्षेने मारली बाजी
Bacchu Kadu
IPL 2022: गुजरात टायटन विरुद्ध लखनऊ सुपर जायंटवर घेतला सट्टा; तिघे अटकेत
Bacchu Kadu
खेड चिपळुणात हाेताेय ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेतील Indian Pitta चा किलबिलाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com