Akola News: अनर्थ टळला! प्रसंगावधान राखत मुलीने घेतला कडाडून चावा, नराधमाला न्यायालयाने ठोठावली मोठी शिक्षा

यावेळी मुलीने प्रसंगावधान दाखवत युवकाचा कडाडून चावा घेतला. मुलीने चावा घेतल्याने युवक गोंधळून गेला ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
Crime News
Crime NewsSaamTv

जयेश गवंडे, अकोला

Akola News: घरात कोणी नसल्याची संधी साधत एका युवकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मुलीने प्रसंगावधान दाखवत युवकाचा कडाडून चावा घेतला. मुलीने चावा घेतल्याने युवक गोंधळून गेला ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (Akola News)

Crime News
Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ? क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार २ जुलै २०१० रोजी सायंकाळच्या सुमारास ती घरी एकटी होती. याच संधीचा फायदा उचलत आरोपी आरोपी रितेश पद्माकर मोहोड (वय २४) हा मुलीच्या घरात शिरला आणि त्याने मुलीचा हात पकडून विनयभंग केला. यावेळी मुलीनेही प्रसंगावधान राखत त्याच्या हाताचा कडाडून चावा घेतला. ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Crime News
Rain Forecast: राज्यात या ठिकाणी 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज

या प्रकरणात आरोपीविरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. पोलिसानी अकोला येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी रितेश मोहोड याला दोषी ठरवून तीन वर्ष कारावास, तीन हजार रुपये दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com