Akola Crime News : मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला जन्मठेप; वाचा न्यायालयाचा आदेश

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
 Crime News
Crime NewsSaam TV

Latest Akola Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा बाल कल्याण अधिकारी यांना एक अल्पवयीन मुलगी ही बागातली देवी परिसरात भीक मागताना दिसून आली होती.

 Crime News
Akola News : चिठ्ठीवर मोबाईल नंबर पाठवणे युवकाला पडले महागात, सक्त मजुरीची शिक्षा

या मुलीला त्यांनी बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार गायत्री बालिकाश्रमात दाखल केले होते. त्यानंतर पीडितेच्या आईने तिचा ताबा घेतला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2019 रोजी पीडितेला वेदना होत असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. तेथे तिने वडीलांनी तिच्यावर अत्याचार करून धमकावल्याचे कथन केले होते.

त्यानंतर जुने शहर पोलिसांनी (Police) आरोपी सावत्र बापाविरूद्ध भादंवि कलम 376 अ, 376 ब,एन, एफ 506 तसेच पोक्सो कायद्याचे कलम 4,5,6 नुसार गुन्हा दाखल केला होता. पीएसआय वर्षा राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

 Crime News
Milk Price : शेतक-यांनाे ! दूध खरेदी दरात हाेऊ लागली वाढ; जाणून घ्या कारण

या खटल्यामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्याकरीता 8 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com