Akola : अल्पवयीन मुलीने वाढदिवसाच्या एक दिवस आधी उचललं टोकाचं पाऊल;अकोल्यात खळबळ

अल्पयीन मुलीने रेल्वे खाली उडी घेत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्याचील मोठी उमरी परिसरातील रहिवाशी आहे.
representative photo
representative photo Saam Tv

अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यातील गुडधी रेल्वे गेट चौकीसमोर रेल्वे खाली उडी घेत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील रहिवाशी आहे. या घटनेने घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी (Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ( Akola Crime News In Marathi )

representative photo
Aurangabad : औरंगाबादेत पंकजा मुंडे समर्थकांचा राडा ; पोलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यामध्ये राहणाऱ्या श्रृतीने गुडधी रेल्वे बंद असाताना तिची दुचाकी वाहन रेल्वे गेटसमोर उभी केली. रेल्वे येत असताना खालून जावून रेल्वे समोर येऊन उभी राहिली. या गेटसमोर उपस्थित असलेल्या नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्याने आरडाओरड करून श्रृतीला बाजूला हो, रेल्वे येत आहे. अशी विनंती केली. मात्र, काही कळायच्या आतच रेल्वे आल्याने त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पुढील तपास सिव्हिल लाइन पोलीस (Police) करत आहे.

representative photo
Breaking News | पुण्यात भवानी पेठेतील सोसायटीमध्ये स्फोट !;पाहा व्हिडीओ

वाढदिवसाच्या अगोदरच्या दिवशीच उचललं टोकाचं पाऊल..

श्रुती नाजुकराव डांगे असं या आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. तिचे वडील एका बँकेत कार्यरत असून ते उमरी परिसरात भाड्याने राहत आहे. श्रुतीचा उद्या म्हणजेचं 13 जून रोजी वाढदिवस आहे. अन् वाढदिवसाच्या अगोदरच तिने रेल्वे (Railway) पुढे आत्महत्या केली. श्रृतीने आत्महत्या केल्यानंतर अकोल्यात खळबळ उडाली आहे. मात्र, तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आले नाही. या घटनेने अकोला परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com