धक्कादायक..अनैतिक संबंधातून मुलगा- सुनेने मिळून संपविले बापाला

धक्कादायक..अनैतिक संबंधातून मुलागा- सुनेने मिळून संपविले बापाला
Akola Crime News
Akola Crime NewsSaam tv

अकोला : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगावात धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने आणि सुनेने मिळून आपल्याच बापाची हत्या (Crime News) करून त्याच्यावर डीझेल टाकून जाळले. विनोद मारोती चोपडे आणि शालू विनोद चोपडे अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांनी (Police) अटक केली आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Letest Marathi News)

Akola Crime News
सत्तार यांना मतिमंद मुलांच्या शिक्षकांकडून प्रशिक्षण द्यावे; आमदार कैलास गोरंट्याल यांची टीका

बोरगाव मंजू (Akola) पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गोरेगाव येथे एक इसम जळालेल्या परिस्थितीत मृतावस्थेत पडला असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आले.

पत्‍नीसोबत संबंध असल्‍याने केले कृत्‍य

मृतदेहाच्या पार्श्वभागावर धारदार शस्त्राने हल्ला करून मग मृतदेह जाळून टाकल्याचे निर्शनात आले. यानंतर पोलिसांनी आपले तपास चक्र फिरविण्यास सुरुवात केली असता मृतक मारोती चोपडे यांचा मुलगा विनोद मारोती चोपडे याच्यावर संशयाची सुई येऊन ठेपली. पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता आपल्या पत्नीशी आपल्याच वडिलांचे अनैतिक संबंध असल्याने त्याचा राग मनात घेऊन मी व माझी पत्नी शालू विनोद चोपडे आम्ही दोघांनी मिळून वडील मारोती गोदाजी चोपडे यांची हत्या केल्याची कबुली दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com