Akola Crime News: दारूने केला घात! रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापालाच संपवलं; मन सुन्न करणारी घटना

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पोटच्या लेकाने बापाची हत्या केली.
Akola Crime News Son ends father life journey  ssd92
Akola Crime News Son ends father life journey ssd92Saam TV

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पोटच्या लेकाने बापाची हत्या केल्याची घटना अकोल्यातील (Akola Crime) सिविल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृषिनगर परिसरात आज घडली आहे. किशोर पाईकराव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र याला अटक केली आहे. (Breaking Marathi News)

Akola Crime News Son ends father life journey  ssd92
Mumbai Crime News: मुंबईत चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार; मरीन ड्राईव्ह परिसरातील घटना

पोटच्या मुलानेच बापाची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील इचोरी गावातील पाईकराव कुटुंब भांडणाला कंटाळून मागील वर्षी अकोला शहरातील कृषी नगर येथे भाड्याने राहत होते. (Latest Marathi News)

वडील किशोर पाईकराव हे नेहमी दारू पिऊन आईला वाद करायचे या त्रासाला कंटाळून घर सोडले. मात्र अकोला येथे सुद्धा त्यांचा त्रास देणे सुरूच होता. वडिलांसोबत घरात नेहमीप्रमाणे दारू पिऊन आले, असता वाद सुरू झाला.

Akola Crime News Son ends father life journey  ssd92
Beed News: कारखान्याने ऊसाचे पैसे थकवले, मुलीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं; शेतकऱ्याने व्हिडीओ बनवला अन्...

यादरम्यान रागाच्या भरात मुलगा जितेंद्र याने वडिलांच्या डोक्याला दगड मारला. या घटनेत किशोर पाईकराव यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिविल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी किशोर पाईकराव यांचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी मुलाला अटक केली.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com