
Akola Crime News : एखादा गुन्हा केल्यानंतर तो लपविण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. दृश्यम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ते यशस्वी ही होतात. मात्र अकोल्यात तब्बल दोन वर्षांनंतर आत्महत्या केल्याचे भासवणाऱ्या माजी तहसिलदारासह चौघांवर न्यायालयाचे आदेशाने पुरावा नष्ट करण्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली होती. मात्र, ती हत्या होती, असा आरोप मृतकाच्या भावाने केला होता. पोलिसांनी (Police) प्रकरण गांभीर्याने घेतले नव्हते.
अखेर न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाची दखल घेणे पोलिसांना घेणे पडले. तब्बल दोन वर्षानंतर अकोल्यातील (Akola) खदान पोलिस ठाण्यात पत्नी, मेहुणा व मावस मेहुणा व एका माजी तहसीलदाराविरूद्ध हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर समाधान भोपसे असे मृतकाचे नाव आहे. भास्कर भोपसे हे अकोला येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्समध्ये(Shriram City Union Finance) सीनिअर मॅनेजर म्हणून कार्यरत हाेते. दाखल एफआयआरनुसार, भास्कर भोपसे व त्यांची पत्नी रसिका यांच्यात वाद होते. पत्नी रसिका व तिचा भाऊ हे दोघे भास्करला पैशासाठी त्रास देत होते.
नेमकं काय घडलं ?
भास्कर समाधान भोपसे हे अकोला येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्समध्ये सीनिअर मॅनेजर म्हणून कार्यरत होते. भास्कर भोपसे यांची पत्नी रसिका व तिचा भाऊ हे दोघे भास्करला पैशासाठी त्रास देत होते. त्यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. या वादातून पत्नी रसिका व तिच्या भावाने भास्कर समाधान भोपसे यांची हत्या केली.
हत्या करून यांनी त्यांनी आत्महत्या केल्याचे भासवले. या हत्येचा उलगडा दोन वर्षांनंतर झाला आहे. या प्रकरणी दोन वर्षानंतर अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यात पत्नी, मेहुणा व मावस मेहुणा व एका माजी तहसीलदाराविरूद्ध हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.