हरणाची शिकार करून करत होते मांस विक्री; वनविभागाने ठोकल्या बेड्या

शिकार करणाऱ्या २ सराईत शिकाऱ्यांना आज अकोल्यातील अकोट वनविभागाने मौजा पाटी, मौजा जुऊळखेड शेत शिवारात अटक करण्यात आली
Akola Crime
Akola Crimeअॅड. जयेश गावंडे

अकोला: २० पेक्षा जास्त काळविटांची (Blackbuck) शिकार करणाऱ्या २ सराईत शिकाऱ्यांना आज अकोल्यातील (Akola) अकोट वनविभागाने अकोट येथील मौजा पाटी, मौजा जुऊळखेड शेत शिवारात अटक (Arrested) करण्यात आली आहे. वन्यप्राणी काळवीट शिकार करून वन्यप्राणीचे मास विकत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १ जण पसार होण्यास यशस्वी झाला आहे. अकोट वनवर्तुळा अंतर्गत मौजा जऊळखेड, मौजा पाटी, येथील मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन्यप्राणी काळवीट मादी यांची शिकार करून मांस विकते वेळी रंगेहात दोघांना पकडले आहे.

हे देखील पहा-

या दोघांकडून ज्ञानेश्वर गजानन जामेवार (रा. जऊळखेड ता. अकोट), सुज्योत राधकीसन मुंडाले (रा. पाटी ता. अकोट) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून २ मोटर सायकल, २ मोबाईल (Mobile) आणि वन्यप्राणी काळवीट मादी यांचे १५ किलो मांस आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई के. आर. अर्जुना उपवनसंरक्षक अकोला वनविभाग अकोला वडोदे सहाय्यक वनसंरक्षक (वने) आर. एन. ओवे वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला (प्रा) अकोला वनविभाग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली अकोट वर्तुळ वनकर्मचारी आर. टी. जगताप. वनपरिमंडल अधिकारी अकोट वर्तुळ, यांचे अधिनस्त वनकर्मचारी सी. एम. तायडे वनरक्षक ए. पी. श्रीनाथ वनरक्षक सोपान जी. रेळे, मोहन वानखडे, सोमंत रजाने, दिपक मेसरे यांनी ही कारवाई केली आहे.

Akola Crime
सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा! 5 मे पर्यंत अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला स्थगिती

शिकाऱ्याकडे छऱ्याची बंदूक

अकोट (Akot) वनविभागाने (Forest Department) पकडलेल्या दोघांकडे ज्ञानेश्वर जामेवार, सुज्योत मुंडाले या दोघांकडे वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी छऱ्याची बंदूक असल्याची माहिती आहे. त्यांनी या आधारे २० पेक्षा जास्त काळविटांची शिकार केली असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

घरपोच विकत होते मांस

अकोट वनविभागाने पकडलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे घरपोच वन्यप्राण्यांचे मांस विकत होते. २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो मांस विकण्यात येत होते. तसेच विटभट्टी चालक या मांसाची जास्त मागणी करत होते, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com