Breaking Akola : बालिकेला रक्तातून HIV ची बाधा; ब्लड बँकेला ठोकले टाळे!

मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या शरिरातील पांढऱ्या पेशी कमी असताना तिला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या प्लेट्सलेट देण्यात आल्यामुळे चिमुकलीला सुद्धा एचआयव्हीची बाधा झाल्याची बाब समोर आली होती.
Breaking Akola : बालिकेला रक्तातून HIV ची बाधा; ब्लड बँकेला ठोकले टाळे!
Akola : बालिकेला रक्तातून HIV ची बाधा; ब्लड बँकेवर कारवाई!जयेश गावंडे

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या शरिरातील पांढऱ्या पेशी कमी असताना तिला एचआयव्ही HIV संक्रमित व्यक्तीच्या प्लेट्सलेट देण्यात आल्यामुळे चिमुकलीला सुद्धा एचआयव्हीची बाधा झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणाची अन्न व औषधी प्रशासनामार्फत गेली दोन दिवस 12 तासांच्यावर चौकशी करण्यात आली. शेवटी आज हा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पटोकार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता. या अहवालात ब्लड बँकेत त्रुटी आढळून आल्याने ब्लड बँकेवर अकोला महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली असून बी.पी.ठाकरे ब्लड बँक सील करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, प्राथमिक अहवालात ब्लड बँकेला क्लीन चिट दिल्याचे समोर आले होते. साम टीव्ही न्यूज ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.

हे देखील पहा -

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील रहिवाशी महिलेने १९ ऑक्टोबर २०२० रोजी एका चिमुकलीला जन्म दिला होता. जन्मानंतर चिमुकलीची तब्येत ठिक राहत नसल्याने तिच्या घरच्यांनी तिच्यावर मूर्तिजापूर येथील अवघाते रुग्णालयात उपचार केले होते. उपचारादरम्यान चिमुकलीच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे तिला पांढऱ्या पेशी देण्यासाठी अकोला येथील बी.पी.ठाकरे रक्तपेढीतून प्लेट्‍सलेट मागविण्यात आल्या होत्या. या प्लेट्‍सलेट एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या असल्यामुळेच चिमुकलीला सुद्धा एचआयव्हीची बाधा झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती.

Akola : बालिकेला रक्तातून HIV ची बाधा; ब्लड बँकेवर कारवाई!
आता कोकणात जायला मोदींच्या नावाने रेल्वे; दानवेंची घोषणा!

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषधी प्रशासन असे सात सदस्यीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. गेली दोन दिवस 12 तासांच्यावर त्यांची चौकशी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबई आणि केंद्रातील अधिकारी या चौकशी समितीत सहभागी होते.

त्यांच्या चौकशीमध्ये बी.पी.ठाकरे ब्लड बँकेतच तांत्रिकदृष्ट्या दोष आढळुन आला आहे. हा गोपनीय अहवाल जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पटोकार यांनी सादर केला होता. त्यामुळे या अहवालानुसार बी.पी.ठाकरे ब्लड बँकेवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली असून सदर ब्लड बँकेला टाळे ठोकण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com