Crime News: आधी दिला चोप, नंतर गुन्हा दाखल; जि. प.च्या वरिष्ठ लिपीकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

आधी दिला चोप, नंतर गुन्हा दाखल; जि. प.च्या वरिष्ठ लिपीकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : जिल्हा परिषदेत वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याविरोधात डाबकी रोड पोलिस (Police) ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, अत्याचार करणाऱ्या वरीष्ठ लिपिकास पीडित महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) आवारात मारहाण केली. मारहाण घटनेच्या सात दिवसांनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली. निलेश रमेश पिंपळकर असे आरोपीचे नाव असून आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Tajya Batmya)

Akola News
Chalisgaon News: सरपंच, ग्रामसेवकाला कार्यालयात कोंडले; अवैध धंद्यांविरोधात कारवाई नसल्‍याने ग्रामस्थ संतप्‍त

अकोला (Akola) जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर निलेश रमेश पिंपळकर हे कार्यरत आहे. या दरम्यान त्याची ओळख जिल्हा परिषदेतील एका महिला कर्मचाऱ्याशी झाली. यादरम्यान आरोपीने पीडित महिलेच्या घरामध्ये जाऊन जबरदस्ती अत्याचार केला. तसेच इतर ठिकाणी नेऊन पीडितेचे वारंवार शोषण केले. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने (Crime News) डाबकी रोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी निलेश पिंपळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महिलेच्या नातेवाईकांनी केली मारहाण

दरम्यान महिलेवरील अत्याचाराबाबत तिच्या नातेवाईकांनी निलेश पिंपळकर याला जिल्हा परिषदेच्या आवारात 16 नोव्हेंबरला मारहाण केली. दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करून यावेळी कर्मचाऱ्यास वाचविले. पिंपळकर मारहाणीत जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com