Akola: मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचा नदीपात्रातुन जीवघेणा प्रवास

मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचा नदीपात्रातुन जीवघेणा प्रवास
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पातोंडा– जवळखेड रस्त्यावरील नदीवर बांधलेल्या (Akola) पुलाची उंची कमी असल्याने तसेच नवीन पुलाचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असल्याने पुलावरून पावसाळ्यात (Rain) पाणी वाहते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्यासाठी पालकांना नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. (Akola Today News)

Akola News
Fraud: पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक

अकोट (Akot) तालुक्यातील पातोंडा हे एक गाव असून विकासापासून मात्र कोसो दूर आहे. पातोंडा जवळखेड रस्त्यावरील निर्गुणा नदीवर पुलाची उंची कमी आहे. नदीला थोडेफार पाणी आल्यास पुलावरून पाणी वाहते व रस्ता बंद होतो. त्यामुळे अनेकदा मुख्य बाजारपेठेचा गावासोबत संपर्क तुटतो. या मार्गावरून (Student) विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज प्रवास करावा लागतो.

मुलांना कडेवर घेऊन प्रवास

पुलावरून पाणी असल्याने वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण होते. चिमुकल्यांना कडेवर घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास करीत आहे. जीव धोक्यात टाकून शाळा गाठावी लागते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com