धक्कादायक..पत्नीचा मृतदेह वाहनांतून नेताना डॉक्टर पती ताब्यात; खून केल्‍या झाले स्‍पष्‍ट

धक्कादायक..पत्नीचा मृतदेह वाहनांतून नेताना डॉक्टर पती ताब्यात; खून केल्‍या झाले स्‍पष्‍ट
Akola Crime News
Akola Crime NewsSaam tv

अकोला : चारचाकी वाहनातून पत्नीचा मृतदेह नेताना अकोल्यातील पातूर येथील एका खाजगी डॉक्टरला चान्नी पोलिसांनी चोंढी परिसरातुन ताब्यात घेतले होते. डॉक्‍टर (Doctor) पतीनेच पत्‍नीचा खून (Crime News) केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. (Akola Crime News)

Akola Crime News
Jalgaon Crime: लहान भावाचा खून करून मृतदेह फेकला नदीत

दरम्यान पोलिसांनी (Police) सदर डॉक्टरची चौकशी केली असता डॉक्टर पतीने पत्नीची प्रकृती खराब आहे. पत्नीने आत्महत्या केली. हृदयविकाराने मृत्यू झाला; अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने चान्नी पोलिसांनी मृतदेह चतारी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) नेला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला (Akola) येथे पाठविला होता. दरम्यान मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनुसार गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी डॉक्टर असलेल्या आरोपी पतीस अटक केली.

विल्‍हेवाट लावण्यासाठी नेत होता मृतदेह

पातूर येथील समर्थ नगर येथे राहणाऱ्या व मुळगाव चोंढी असे असलेल्या डॉ. राजेश भास्कर ठाकरे याने त्याची पत्नी वर्षा भास्कर ठाकरे (वय 35) हिची गळा आवळून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने चोंढी येथे घेऊन गेला असता गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. सदर डॉक्टर हा परत पातूरकडे येत असताना चान्नी पोलिसांनी त्याला पकडल्याने संपूर्ण प्रकारणाचा उलगडा झाला.

डॉक्‍टर पतीला अटक

सदरच्या प्रकरणी वर्षा भास्कर ठाकरे हिची हत्या केल्याप्रकरणी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश भास्कर ठाकरे (रा.समर्थ नगर,पातूर) यास अटक करून गुन्हा दाखल केला असून पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठाणेदार हर्षु रत्नपारखी करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com