Akola Crime News: नकार दिला तर ॲसिड टाकेल; धमकी देत मुलीचा विनयभंग, आरोपी युवकाला अटक

नकार दिला तर ॲसिड टाकेल; धमकी देत मुलीचा विनयभंग, आरोपी युवकाला अटक
Akola Crime News
Akola Crime NewsSaam tv

अकोला : अकोल्यातील पातूर येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर पातूर (Patur) येथील एका युवकाने (Akola News) अतिप्रसंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपी युवकास अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Akola Crime News
Nashik News: राजस्थानमधून ८५ उंट कत्तलसाठी; पथकाकडून सुटका, दोन उंटाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार पातूर शहरातील एका शाळेत सहावीच्‍या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपी वाईट (Crime News) उद्देशाने पाठलाग करत होता. दरम्यान पीडितेच्या घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत थेट घरात शिरून आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढून तिचा विनयभंग केला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू नकार दिल्यास तुझ्या अंगावर ॲसिड फेकेल, अशी धमकी दिली.

Akola Crime News
Samruddhi Mahamarg: शेतकऱ्याने ट्रॅक्टरने रोखला समृद्धी महामार्ग; महामार्गावरील पाणी शेतात गेल्‍याने कांद्याचे नुकसान

संशयीत ताब्‍यात

घडलेल्या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी घाबरून गेली. सायंकाळी तिची आई घरी आली असता तिने घडलेला प्रसंग आईकडे सांगितला. पीडितेच्या आईने क्षणाचा विचार न करता थेट पातूर पोलिस स्टेशन गाठून झालेल्या घटनेबाबत तक्रार दिली. फिर्यादीच्या फिर्यादीवरून पातूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शेख सोहेल उर्फ राजू शेख ईमाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शेख सोहेल उर्फ राजू शेख ईमाम याला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com