Akola News: नववर्षापासून आरटीओचा नवा नियम; अकोलेकरांना करावे लागेल पालन

नववर्षापासून आरटीओचा नवा नियम; अकोलेकरांना करावे लागेल पालन
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : प्राणांतिक अपघात कमी करण्याच्या उद्देशाने (Akola) अकोला जिल्ह्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) जयश्री दुतोंडे यांनी घेतला आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाईल,’ असे दुतोंडे यांनी सांगितले. (Tajya Batmya)

Akola News
Chitra Wagh: १८ वर्षांखालील मुलींसाठी लव्ह जिहाद कायदा गरजेचा; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

नववर्षाच्‍या पहिल्‍या दिवसापासून हा नियम अंमलात येत असून दुचाकीधारकांना आताच हेल्मेटची (Helmet) सोय लावावी लागणार आहे. अन्यथा कारवायांना सामोरे जावे लागेल. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. त्या शहरांमध्ये त्याचे पालनही होते. मात्र, यापूर्वी जिल्ह्यात हेल्मेटसक्तीचे प्रयोग झाले.

मोहीम सुरु झाल्यानंतर दुचाकीधारकांकडून हेल्मेटसाठी प्रतिसाद मिळतो. परंतु त्यानंतर पुन्हा दुचाकीधारक विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास करतात. एखाद्या वेळेस अपघात झाल्यास डोक्याला दुखापत होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. त्याअनुषंगाने ही हेल्मेटसक्तीची मोहीम राबवण्यात येईल; अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com