बाजोरिया हे शिंदे गटात नाही याचा खुलासा करावा - नितीन देशमुख

अकोल्यात आज विश्रामगृहात शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSaam Tv

अकोला- शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले नसल्याचे त्यांनी बैठक घेऊन सांगतीले होते. मात्र जनतेत जो संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत बाजोरिया यांनी मिडियासमोर येऊन खुलासा करावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बाजोरिया यांना केले आहे. दरम्यान आज शिवसेनेचे अकोला संपर्कप्रमुख प्रकाश शिवडकर यांनी विश्रामगृह येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

हे देखील पाहा -

या बैठकीत गोपिकीशन बाजोरिया, आमदार विपलव बाजोरिया हे उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. कारण काही दिवसांपूर्वी माजी आमदार बाजोरिया हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थित होते. तर ते शिंदे गटात गेल्याचे वृत्त देखील माध्यमांमध्ये आले होते. दरम्यान जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना विचारले असता, माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा की, ते शिंदे गटात गेले की नाही याचा असेही आमदार देशमुख म्हणाले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांनी बंड करीत नवी चूल मांडल्याने आता अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. अकोल्यात आज विश्रामगृहात शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

Nitin Deshmukh
शिंदे सरकारला आपल्याच संकल्पाचा विसर? 23 दिवसांत 89 शेतकऱ्यांची आत्महत्या

संपर्कप्रमुख प्रकाश शिवडकर, जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. मात्र या बैठकीला शिवसेना नेते गोपिकिशन बाजोरिया आणि आमदार विपलव बाजोरिया उपस्थित नसल्याने तर्क वितर्क काढण्यात येत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com