Akola News: भाजपच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आत्मक्लेश आंदोलन

भाजपच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आत्मक्लेश आंदोलन
Akola News
Akola NewsSaam Tv

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्यासह (BJP) भाजपच्या नेत्यांविरोधात आज (Shiv Sena) शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Breaking Marathi News)

Akola News
Chitra Wagh: लव जिहाद विरोधी कायद्यासंदर्भात अधिवेशनात निश्चीत विचार; चित्रा वाघ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाजपच्या हातातली कळसुत्री बाहुली असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच केंद्रीय मंत्री सुधांशु त्रिवेदी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपमधील अनेक नेत्यांनी अपमानजनक टिपणी व वक्तव्य करण्याची मालिका लावली आहे. यामुळे भाजपचे छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम हे केवळ निवडणुकीपुरते ढोंग असल्याचे सिद्ध झाले असल्‍याचा आरोप यावेळी केला आहे.

निवडणुकीमध्ये छत्रपतींच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करणाऱ्या भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे शहर शिवसेनेच्यावतीने हे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com