Akola Donkey's Pola: अकोटमध्ये आगळीवेगळी परंपरा! पोळ्याच्या दिवशी बैलांचा नव्हे तर गाढवांचा पोळा

Akola News: अकोटमध्ये आगळीवेगळी परंपरा! पोळ्याच्या दिवशी बैलांचा नव्हे तर गाढवांचा पोळा
Akola Donkey's Pola
Akola Donkey's PolaSaam Tv

>> हर्षदा सोनोने

Akola Donkey's Pola:

महाराष्ट्र आणि कर्नाटकात पोळा हा सण साजरा करून या दिवशी बैलांची पूजा केली जाते. तर या सणास दक्षिण महाराष्ट्रात ‘बेंदूर’ असेही म्हणतात. या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते, अशी समजूत आहे. आज राज्यात पोळा आणि बेंदूरचा उत्साह असतानाच विदर्भातील एका गावात मात्र वेगळ्या पद्धतीने पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. येथे बैलपोळा नाही तर गाढवांचा पोळा साजरा केला जातो.

अकोला जिल्हातल्या अकोट या ठिकाणी बैलाप्रमाणे गाढवाची पूजा करून पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोकजीवनातील बैलपोळा हा सण शेतकरी बैलांच्या शेतीसाठी राबणाऱ्या उपकारांची कृतार्थता प्रगट करण्यासाठी साजरा करतात, आपणावर केलेल्या उपकारांचे मूल्य परत करता येत नाही, म्हणून त्याची परतफेड कृतज्ञतेमधून केली जाते. गाईसाठी ‘गाईगोंधन’, गुराढोरासाठी ‘झेंडवाई’ तर बैलासाठी ‘बैलपोळा’ हे सण लोक साजरे करतात.

Akola Donkey's Pola
Ganesh Festival: मोठी बातमी! आता गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

तर पोळ्याच्या दिवशी बैल हा नुसता बैल न राहता तो नंदीबैल होतो. त्याच रितीने ज्यांची उपजीविका ही गाढवांवर अवलंबून आहे ते लोक ‘गाढवांचा पोळा’ साजरा करतात. जिल्ह्यातील अकोट या गावी ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू झाली आहे. विशेषत: येथील भोई समाजातील लोक गाढवांची पूजा पोळ्याच्या दिवशी करतात. भोई समाजाने ज्या गाढवांना देवत्व बहाल केले. त्या गाढवाला मात्र प्राचीन परंपरेने नेहमी अप्रतिष्ठित मानले आहे. (Latest Marathi News)

तर अकोट या शहरात मात्र भरविला जाणारा गाढवांचा पोळा अप्रतिष्ठेचा मानला जात नाही. तर गाढवाच्या जीवावर उपजीविका करणारे भोई समाजाचे लोक गाढवाच्या पाठीवर ओझे लादून माल वाहण्याचे काम करतात. गाढवाच्या मदतीने आपली उपजीविका चालवितात, त्यांना दररोज उपजीविकेसाठी मदत करणाऱ्या गाढवाची ते बैलाप्रमाणे पूजाही करतात, श्रमाला महत्व देणारे भोई समाजाचे लोक गाढवांच्या श्रमालाही पूजनीय मानतात. म्हणूनचे हे या श्रम करणाऱ्या संस्कृतीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य मानावे लागेल.

Akola Donkey's Pola
Bail Pola: बैलावर कोरली मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा; गावातल्या बैलपोळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं

असा साजरा होतो गाढवांचा पोळा..!

गाढवांचा पोळ्याच्या दिवशी गाढवाला आंघोळ घातली जाते, त्याला बैलाप्रमाणे सजविले जाते, तर वेगवेगळ्या रंगाने गाढवाला रंगविले जाते. संध्याकाळी सर्व गाढवांना एका ठिकाणी उभे करून त्याची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते आणि घरात बनविलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. गाढवांना ठोंबरा भिजवून ठेवलेल्या ज्वारीचा कणखीचा गोळा खाऊ घातला जातो, पुरुषाप्रमाणे घरातील गृहिणी आपल्या घरच्या गाढवाची भक्तिभावाने पूजा करतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com