नदीच्या पुलावरून बाईकसह नदीत बुडाला युवक, नेमकं काय घडले पहा

नदीच्या पुलावरून बाईकसह नदीत बुडाला युवक, नेमकं काय घडले पहा
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : जिल्ह्यात अनेक भागांमध्ये संततधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. अकोल्यात (Akola) एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यांमध्ये एक युवक बाईकवरून नदीच्या पुलाहुन पुराचे पाणी वाहत असताना पुल ओलांडत होता. या दरम्यान युवक नदीच्या पुलावरून थेट बाईकसह नदीत युवक बुडालाय. (Akola Today News)

Akola News
Pachora: पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत तीन वर्ष अश्लील चाळे; नराधम पित्यास अटक

जिल्ह्यातील मुर्तीजापुर (Murtijapur) तालुक्यातील मुर्तीजापुर ते शेलू ऋणमोचन रस्त्यावरील ब्रम्ही गावाजवळील कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असतांना हा प्रकार घडलाय. गुंजवाडा येथील व्यक्तीने दुचाकीवरुन पुराच्‍या पाण्यातून जायचे धाडस केले. यामध्ये उपस्थित नागरिकांसमोर तो व्यक्‍ती मध्यभागी गेला. तेवढ्यात तो बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहु लागला. बघता बघता या व्यक्तीसह दुचाकी पाण्यात बुडाली.

सुदैवाने वाचला

दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्‍तीला याचा खूप मोठा फटका बसला आहे. दैव बलवत्तर म्हणून परंतु सुदैवाने या व्यक्तीला पाण्यात पोहता येत असल्यामुळे पोहत पोहत नदीच्या काठावर आला अन्‍यथा मोठा अनर्थ घडला. या घटनेची माहिती अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पिंजरच्या मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. तात्काळ रेस्क्यु ऑपरेशनसाठी रवाना झाले. परंतु, अवघ्या दहा मिनिटातच मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मोहीते, तहसीलदार पवार यांनी फोनवरून माहिती दिली की सदर व्यक्‍ती पोहत पोहत सुखरुप बाहेर निघाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com