
अकोला : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे अनेकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. मात्र दररोजचा प्रवास असतोच. पण काही लोकांना परिस्थितीमूळे इलेक्ट्रिक वाहने (Electric Bike) घेणेही परवडणार नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या वाहनांमध्ये वेगवेगळे जुगाड केले आहेत. असाच काहिसा प्रकार अकोल्यातही (Akola) पाहायला मिळाला. एका व्यक्तीने चक्क आपल्या दुचाकी वाहनाचा सायकलमध्ये बदल करत दुचाकी केली आहे. (Akola News Desi Jugad)
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या (Petrol) किंमती शंभरी पार आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. मात्र अनेकांना परिस्थिती अभावी हे वाहने देखील घेणे अशक्य आहे. त्यामुळे लोक आता आपल्या दुचाकी वाहन पेट्रोल ऐवजी कशी चालवली जाईल याची युक्ती लढवत आहेत. अकोल्यात पेट्रोल दरवाढीमुळे अनेकांनी आपल्या दुचाकी वाहनात बदल केला.
स्कुटी कम सायकल
शहरातील मलकापूर परिसरामध्ये राहणारे प्रदीप माणिकराव घनबहादुर यांनी आपल्या दुचाकी स्कुटी वाहनांत बदल करून त्याचे सायकल केली आहे. या दुचाकी वाहनाचे इंजीन आणि इतर पार्ट काढून त्यामध्ये सायकलचे पार्ट्स, सायकलचे रिंग-टायर, चेन सिस्टीम, पायडल यासारखे वस्तू फिट केले आहे. आता प्रदीपराव त्यांच्या स्कुटी सायकलने अख्ख शहर फिरत आहे. त्यांचा स्कुटीचा हा जुगाड पाहून अनेक लोक त्यांचं कौतुकी करत आहेत, शहरात वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवले असता, त्याचा हा जुगाड पाहूनही चक्राहून गेलेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.