मामा-भाच्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

हनुमानाच्‍या दर्शनासाठी गेलेल्‍या युवकाचा डोहात बुडून मृत्‍यू
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : अकोल्यातील युवक वारी हनुमान येथे दर्शनासाठी गेले होते. यातील काही मित्र मंदिराकडे होते. तर काही मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले. यात एका युवकाचा डोहात बुडून मृत्‍यू (Death) झाल्‍याची घटना घडली. (akola news young man who went to see Hanuman died after drowning in dam)

Akola News
Nandurbar: निंबाच्या झाडात साकारलेल्या हनुमान मंदिराजवळ चालीसा पठन

गेल्या वर्षानुवर्षे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मामा भाच्याच्या डोहात शेकडो जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. शासनाकडून तसेच नागरिकांकडून दक्षता घेण्यासाठी सांगण्यात येते. मात्र ह्या बाबीला जुमानत नाही. अशीच घटना आज घडली असून अकोल्यातील (Akola) युवक दर्शनासाठी वारी हनुमान येथे आले होते. यात मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले असता राज गुडदे (वय १९, रा. सिंधी कॅम्प अकोला) हा अंघोळ करीत असताना बुडाला.

नागरीक पोहचेपर्यंत युवकाचा मृत्‍यू

मित्रांनी आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सदर युवक बुडाला होता. याबाबत वारी येथील सरपंच शिवा पतींगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत हिवरखेड पोलिसांना (Police) माहिती दिली. याबाबत पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com