Akola: शेतीच्‍या वादातून युवक चढला मोबाईल टॉवरवर

शेतीच्‍या वादातून युवक चढला मोबाईल टॉवरवर
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : अकोल्यातील अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोबाईलच्या टॉवरवर एक युवक आत्महत्या (Suicide) करण्याच्या उद्देशाने चढला. याबाबतची माहिती अकोट फाईल पोलिसांना (Police) मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या इसमास खाली उतरवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (Akola Today News)

Akola News
Jalgaon: शालेय विद्यार्थ्यांचे ६६ टक्के लसीकरण; बूस्टर लसचाही टक्का वाढला

अकोला (Akola) शहरात येत असलेल्या अकोट फाईल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अकोट अकोला रोडवरील बीएसएनएल टॉवरवर आज एक इसम चढला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच अकोट फाइल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. सदरची परिस्थिती पाहता पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचले असून सदर युवकाला उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

पारीवारिक वादातून चढला टावरवर

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सदर इसमाचे नाव गिरी असून हा इसम उमरी परिसरात राहतो. शेतीच्या पारिवारिक वादावरून हा इसम टावरवर चढल्याची माहिती आहे. याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पोहोचताच युवकाला पाहण्यासाठी या परिसरामध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. सदर युवक हा शेतीच्या वादातून विरूगिरी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com