Akola Flood: तब्बल १८ तास पुरात! नदीच्या मधोमध अडकलेल्या आजाबीईंची अशी झाली सुटका

जाको राखे साईंया मार सके ना कोय अशी म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. याच म्हणीचा प्रत्यय अकोल्यात आला आहे. तब्बल १८ तासांत पुरात अडकून सुद्धा एक आजीबाई सुखरूप आपल्या घरी पोहचल्या आहेत.
Akola Old Woman Rescued From Flood
Akola Old Woman Rescued From Floodअॅड जयेश गावंडे

अकोला : अकोल्यासह (Akola) संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर (Flood) आला. पूर्णा नदीच्या पुरात एक ६० वर्षावरील आजीबाई (Old Women) वाहून गेली. मात्र सुदैवाने एका झाडाच्या फांदीला धरुन आजीने या छोट्या झाडाचा आसरा घेतला. झाडाला पकडून आजी १८ तासांच्यावर पूराशी संघर्ष करत होती, आता या आजीला वाचविण्यात यश आले आहे. (Akola Flood News)

हे देखील पाहा -

अकोला जिल्ह्यातील आपोती येथील एक आजी अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे दर्शनासाठी गेली. २१ जुलै रोजी ऋणमोचनला ही आजी गेली अन् पूर्णा नदीच्या काठावर पाय धुण्यासाठी उतरली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसंच पाण्याचा अंदाज न आल्याने आजीबाई पूर्णा नदीच्या प्रवाहात वाहून गेली. पूर्णा नदी दुधडी भरून वाहत असल्याने त्या दूरवर वाहून जात होत्या. ते पाहून संत गाडगे महाराज मंदिरावर उपस्थित असणाऱ्या एका युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांना वाचवू शकला नाही. रात्री बऱ्याच वेळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील एन्डली गावात काल दुपारच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्या युवकाला एक आजी पूर्णा नदीच्या पात्रात मधोमध एका छोट्या झाडाला आसरा घेवून पकडून असल्याची दिसून आली. लागलीच बकऱ्या चारणाऱ्या दीपक कुरवाडे याने गावातील इतर लोकांना बोलावले. अन् त्यानंतर न्यानेश्वर वानखडे, सुरेश बावनेर, तेजस साबळे सह गावातील इतर युवक येथे दाखल झाले. अन् आजीला या पाच ते सहा युवकांनी दोरीच्या आणि हाताच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

Akola Old Woman Rescued From Flood
बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; शाळकरी मुलांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

या दरम्यान गावकऱ्यांनी त्यांना विचारलं, आजीबाई तुम्ही कुठच्या आहात, आणि कुठून आले. तेव्हा आजींनी वत्सलाबाई शेषराव राणे असं नाव सांगितलं. तसेत ऋणमोचन येथून नदीत वाहून आले असल्याचे त्यांनी सांगितले. ऋणमोचन ते एन्डली परिसराचे नदीचे अंतर हे सुमारे एकते दीड किमी येते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com