मोदींना कृषी कायदे बनविण्याचे डोके कुणाचे; आंबेडकर यांची टीका

आंबेडकर यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांचा समाचार घेतला.
मोदींना कृषी कायदे बनविण्याचे डोके कुणाचे; आंबेडकर यांची टीका
मोदींना कृषी कायदे बनविण्याचे डोके कुणाचे; आंबेडकर यांची टीकाजयेश गावंडे

अकोला - गत आठवड्यात शेतकरी समर्थनार्थ देशव्यापी बंदला महाविकास आघाडी सरकारने दिलेला पाठिंबा हा केवळ दिखावा होता, असा आराेप करीत मोदींना कृषी कायदे बनवण्याचे डोके कुणी दिले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अधक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ओबीसींना उद्धस्त करण्याचा प्रयत्न सुरू असून, या मुद्दाची अभ्यासपूर्ण मांडणी करून लढ्यात उतरणे आवश्यक असल्याचेही आंबेडकर म्हणाले. 

हे देखील पहा -

कोरोना नियमाचे पालन करीत मोजक्‍या दोनशे अनुयायांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला हाेता.  आंबेडकर यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांचा समाचार घेतला.  सभेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभाने  केले होते. यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अन्य नेतेही उपस्थित हाेते.  प्रकाश आंबेडकर म्हणाले मोदींना हे कृषी कायदे बनविण्याचे डोके कुणी दिले?  सन २००५-०६ मध्ये राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील कृषि कायद्यातील मसुदे व केंद्राच्या कायद्यातील तरतुदी सारख्याच आहेत. 

मोदींना कृषी कायदे बनविण्याचे डोके कुणाचे; आंबेडकर यांची टीका
किती हा भाबडेपणा? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

त्यामुळे कृषी कायद्याच्या विराेधातील बंदला काँग्रेस-रांका दिलेला पाठिंबा हा तोंडदेखलेपणा असल्याची  टीका आंबेडकर यांनी केली.  तर आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर आरोप करीत, मोदी म्हणजे हिटलरशाही; ते मुस्कटदाबी कशी करतात, ही अभ्यापूर्ण मांडणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नेते- कार्यकर्त्यांनी सर्वांगाने अभ्यासकरणे, स्वत:कडील माहिती अद्यायावत ठेवणे, आवश्यक आहे. पुढील १० वर्षे ओबीसी लढ्यासाठी महत्त्वाचे आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com