Akola: पोलिसांच्या मोहिमेला यश; चोरी गेलेले 69 मोबाईल शोधून केले परत
Akola: पोलिसांच्या मोहिमेला यश; चोरी गेलेले 69 मोबाईल शोधून केले परतजयेश गावंडे

Akola: पोलिसांच्या मोहिमेला यश; चोरी गेलेले 69 मोबाईल शोधून केले परत

हरवलेल्या तसेच चोरी गेलेल्या मौल्यवान वस्तूंचा महिनाभरात शोध लावायचा आणि तपासाअंती जप्त केलेला मुद्देमाल ज्यांचा असेल त्यांना द्यायचा, अशी मोहीम अकोला जिल्ह्यामध्ये सुरू केली आहे.

जयेश गावंडे

अकोला : हरवलेल्या तसेच चोरी गेलेल्या मौल्यवान वस्तूंचा महिनाभरात शोध लावायचा आणि तपासाअंती जप्त केलेला मुद्देमाल ज्यांचा असेल त्यांना द्यायचा, अशी मोहीम पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यामध्ये Akola District सुरू केली आहे. त्यानुसार महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातून ६९ मोबाइल पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतले. हे मोबाइल ज्यांचे होते त्यांना परत करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान पोलिसांनी मोबाइल सोबतच चोरी गेलेली वाहने चोरी गेलेले मौल्यवान दागिने, इतर वस्तू यांचा शोध घेतला असता पोलिसांनी २० वाहने ज्यामध्ये दुचाकीचा सामावेश आहे. ज्याची किंमत २५ लाख ८० हजार ४८६ रुपये होते. इतकी मोठी रक्कम पोलिसांनी आरोपीकडून वसूल केली.

Akola: पोलिसांच्या मोहिमेला यश; चोरी गेलेले 69 मोबाईल शोधून केले परत
Pune: चोरीच्या उद्देशाने गोळीबाराचा थरार

मोबाइलसह Mobile या मौल्यवान वस्तू पोलिसांनी फिर्यादी पोलिस ठाण्यात बोलावून सन्मानपूर्वक त्यांच्या हवाली केले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक डिटेक्शन सिव्हिल लाइन पोलिसांनी केले असून, त्यांनी सर्वाधिक १९ मोबाइल आरोपींकडून जप्त केले आहेत. त्यानंतर रामदास पेठ पाेलिसांनी १२ आणि डाबकी रोड पोलिसांनी १२, सिटी कोतवाली पोलिसांनी ९ मोबाइल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून मोबाइल जप्त केले.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com