Swabhimani Shetkari Sanghatana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बोगसगिरी; 'स्वाभिमानी' ची जिल्हाधिका-यांकडे तक्रार

pradhan mantri pik vima yojana : या प्रकरणात जिल्हाधिकारी न्याय देतील अशी अपेक्षा शेतक-यांनी व्यक्त केली आहे.
swabhimani shetkari sanghtana Latest News, Akola Latest News
swabhimani shetkari sanghtana Latest News, Akola Latest Newssaam tv

- हर्षदा सोनोने

Akola News : अकोल्यात सन 2021 च्या खरीप हंगाम कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कंपनीने बोगसगिरी केल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिका-यांना केली आहे. याप्रकरणी शासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिका-यांनी दिला आहे. (Maharashtra News)

swabhimani shetkari sanghtana Latest News, Akola Latest News
Sangli DCC Bank: अध्यक्षांच्या दालनात संचालकांची झटापट? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रकरण पाेचले पाेलिस ठाण्यात; जीवे मारण्याची तक्रार दाखल

अकोला जिल्हातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यावर संबंधित यंत्रणेतील घटकांसह शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांची फसवणूक तर शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रातही गोंधळ घालत शेतकऱ्यांना विमा परताव्यातून बाद ठरवले आहे.

swabhimani shetkari sanghtana Latest News, Akola Latest News
Satara : रात्रीच्या सुमारास सावित्रीच्या लेकींनी आंदाेलनाचे हत्यार उपसले अन् अधिका-यांचे डाेळे उघडले; घटना वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, एसटी महामंडळ Shame Shame...

त्याचबरोबर कंपनीने केलेल्या पंचनाम्यावरून ही शुध्द फसवेगिरी असल्याचे अधोरेखित होत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

याप्रकरणी शासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चंद्रशेखर गवळी (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, अकोला) यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com