धक्कादायक ! सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या

जिल्ह्यातील तेल्हारा (Akola District) तालुक्याल्या तळेगाव बाजार येथे सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या (Murder) केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे.
धक्कादायक ! सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या
धक्कादायक ! सख्ख्या भावानेच केली भावाची हत्याSaam Tv

अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा (Akola District) तालुक्याल्या तळेगाव बाजार येथे सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या (Murder) केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. आपसी वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. तळेगाव बाजार येथील रहिवासी शिवाजी गणेश मापे वय 40 व त्याचा भाऊ हरिदास गणेश मापे वय 35 या दोघा भावा मध्ये बाचाबाची होऊन याचे वादात रूपांतर झाले.

दरम्यान, लहान भाऊ हरिदास गणेश मापे याने चाकुने शिवाजी गणेश मापे याचे छातिवर चाकुने सपासप वार केले व कुणिहि भांडणात मध्ये येऊ नये म्हणून हरिदास चाकु घेऊन उभा होता व कोणीही मधे आलें तर खुपसून देईन असे धमकावत होता. त्यामुळे कुणिही मध्ये गेले नसल्याची माहिती आहे.

दरम्यान गावातील नागरिकांनी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये माहिती देण्यासाठी फोन केला असता दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. संशयित आरोपी आपल्या पत्नीला व मुलांना घेऊन मोटरसायकल ने जात असताना गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. दोघे भावांच्या भांडणाचे मुळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com