Crime: काळवीटाच्या मासाची बाजारात विक्री; दाेघे अटकेत, एक फरार

या प्रकरणातील एकाचा वन विभाग शाेध घेत आहे.
Arrest
ArrestSaam Tv

अकोला : जंगलात (jungle) शिकार करून काळवीटाच्या मासांची बाजारात विक्री करणारी टोळी वनविभागाने (forest) जेरबंद (arrest) केली आहे. अकोला (akola) जिल्ह्यातल्या अकोट (akot) तालुक्यातील गरसोळी शेत शिवारात वन्यप्राणी काळवीटाची शिकार करून काळवीटचे मांस बाजारात विक्री करताना वनविभागाने सापळा रचून टोळीचा पर्दापाश केला आहे. (akola latest marathi news)

किसन नरोकर, विक्रम टाकसाळे आणि भीमराव सोळंके असे संशयित आरोपींची नाव असून हे तिघे काळवीटाची शिकार करून ती कावसा या गावातील बाजारांत मासांची विक्री करत होते. यापैकी भीमराव सोळंके हा घटनास्थळावरून फरार झाला.

Arrest
काॅंग्रेसचा हात पकडणा-या 'त्या' बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करा; BJP ची मागणी

वनविभागाने या संशयितांकडून काळवीट मांस, एक दुचाकी (vehicle) आदी साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई अकोट वर्तुळ वनकर्मचारी सी. एम. तायडे, वनरक्षक सोपान जी. रेळे, मोहन वानखडे, सोमंत रजाने, दिपक मेसरे आदींनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Arrest
Bacchu Kadu: राज्यमंत्री बच्चू कडूंना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
Arrest
Accident: भरधाव ट्रकने माय- लेकीस चिरडलं; मुलगा गंभीर जखमी
Arrest
Mahableshwar: शालेय पोषण आहारात मुलांना मिळणार मध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com