नागपुर प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांची दारू पार्टी; पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

कामांच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्या सुरक्षारक्षकांना रुग्णालयाच्या अधीक्षकांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
नागपुर प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांची दारू पार्टी; पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
नागपुर प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांची दारू पार्टी; पार्टीचा व्हिडिओ व्हायरलसंजय डाफ

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयातील (Mental Hospital) सुरक्षा रक्षकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील सुरक्षा रक्षक दारू पार्टी (Alcohol Party) करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षारक्षक ड्युटीवर असताना दारू पार्टी करताना दिसत आहे. या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्या सुरक्षारक्षकांना रुग्णालयाच्या अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

त्यात सरकारी अनास्थेमुळे नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय हे 42 एकरवर पसरलेले असून त्या तुलनेत सुरक्षेची जबाबदारी बारा सुरक्षा रक्षकांवर आहे. रुग्णालयातील वार्ड कडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर वार्डातील रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी असते मात्र तेच नशेत असतील तर रुग्णालयाची सुरक्षा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com