मद्यधुंद पोलिसांनी महामार्गावर वाहन आडवे लावून केला डान्स; महामार्ग 40 मिनिटे जाम

बीबी पोलीस स्टेशनच्या मद्यधुंद ASI यांसह पोलिसांनी महामार्गावर वाहन आडवे लावून डान्स केला आहे. त्यांच्या या करामतीमुळे महामार्ग तब्बल 40 मिनिटे जाम झाला होता.
मद्यधुंद पोलिसांनी महामार्गावर वाहन आडवे लावून केला डान्स; महामार्ग 40 मिनिटे जाम
मद्यधुंद पोलिसांनी महामार्गावर वाहन आडवे लावून केला डान्स; महामार्ग 40 मिनिटे जाम संजय जाधव

बुलढाणा: मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील बीबी पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सुगदेव पवार व इतर पोलिसांमुळे ट्राफिक जाम झाली. तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलढाणाकडे जाणारे आमदार संजय गायकवाड यांनी सदर पोलिसांना चांगलेच धारेवर धारल्याची माहिती कळली आहे. (alcoholic police dance on highway, traffic was jam for 40 minutes)

हे देखील पहा -

'पोलीस' लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यपी पोलिसांनी जालना खामगाव महामार्गावर वाहन उभं करून महामार्गाच्या मध्यभागी डान्स सुरू केला. हा प्रकार जवळपास 40 मिनिटं सुरू होता. दरम्यान या महामार्गावर ट्रॅफिक जाम झाली होती. सदर प्रकार देऊळगाव मही नजीक सरंबा फाट्यावर आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. याबाबत प्राप्त माहितीनुसार आमदार संजय गायकवाड हे आपल्या वाहनाने बुलढाण्याकडे येत होते. देऊळगाव महीच्या सरंबा फाट्यानजीक पुढे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ठप्प झालेल्या वाहतूकीतून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध "पोलीस" लिहिलेली पाटी असलेली एम. एच. २८ ए. एन. ३६४१ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कार समोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते.

परिणामी चिखली येथून येणारी वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती. हा प्रकार पाहून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांचा राग अनावर झाला व त्यांनी त्या तथाकथित पोलिसाला चांगलेच धारेवर धरले. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्यामध्ये मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद झाला व पोलीस लिहिलेल्या त्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून त्यांनी पळ काढला. यात बीबी पोलीस स्टेशनचा सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय पवार व त्याचे दोन साथीदार असल्याची माहिती कळली आहे.

मद्यधुंद पोलिसांनी महामार्गावर वाहन आडवे लावून केला डान्स; महामार्ग 40 मिनिटे जाम
बेळगाव महापालिका निवडणुक: एमआयएमचे शाहिदखान पठाण प्रभाग क्र. 18 मधून विजयी

यावर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांचेकडून माहिती घेतली असता त्यांनी घडलेला प्रकार हा पोलीस खात्याला अशोभनीय असून रात्रीच ASI विजय पवार यांचा डिफॉल्ट रिपोर्ट मागविला असून तात्काळ त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com