दारूड्या पोस्टमास्तरची ग्राहकाशी फ्री स्टाईल

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील टपाल कार्यालयात चक्क दारूड्या पोस्टमास्तरनेच ग्राहकांशी दारू ढोसून फ्री स्टाईल हाणामारी केली आहे.
दारूड्या पोस्टमास्तरची ग्राहकाशी फ्री स्टाईल
दारूड्या पोस्टमास्तरची ग्राहकाशी फ्री स्टाईलअभिजीत घोरमारे

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव  येथील टपाल कार्यालयात चक्क पोस्टमास्तरनेच ग्राहकांशी दारू ढोसून फ्री स्टाईल केल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ही बाब निश्चितच गंभीर आहे. (Alcoholic postmaster fought with customer)

हे देखील पहा -

फ्री स्टाईल करणाऱ्या पोस्टमास्तरचे नाव सयाम असल्याचे समजते. स्थानिक पोस्टमास्तर कार्यालयात राहात नाही, मद्यपान करून असतात, कधी हजर असूनही कामे करत नाहीत, ग्राहकांची कामे कधीच वेळेत होत नाही अशा अनेक तक्रारी होत्या. मात्र अधिकारी तक्रारींकडे कानाडोळा करीत असल्याने पोस्टमास्तरचे धिंगाणा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दारूड्या पोस्टमास्तरची ग्राहकाशी फ्री स्टाईल
Viral Video : अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा

पोस्टमास्तरची त्वरित हकालपट्टी करा अन्यथा टपाल कार्यालयच बंद करा असा सूर व्यक्त केला जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com