अलिबाग समुद्र किनारा काळवंडला; किनाऱ्यावर दीड किलोमीटर पर्यत तेलाचा तवंग

एक ते दीड किलोमीटर परिसरात सध्या तेल तवंगाचे गोळे साचले असल्याचे पाहायला मिळत आहे आहे.
अलिबाग समुद्र किनारा काळवंडला; किनाऱ्यावर दीड किलोमीटर पर्यत तेलाचा तवंग
अलिबाग समुद्र किनारा काळवंडला; किनाऱ्यावर दीड किलोमीटर पर्यत तेलाचा तवंगराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड  -  मिनिगोवा म्हणून अलिबागचा Alibagh समुद्रकिनाऱ्याची ओळख आहे. मात्र सध्या हा समुद्रकिनारा तेलाचा तवंग साचल्याने काळवंडला आहे. त्यामुळे किनाऱ्याचे सौंदर्य विद्रुप झाले आहे. किनाऱ्यावर फिरताना पर्यटक आणि नागरिकांना त्रास होत आहे. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जन करण्यास येणाऱ्या भविकानाही या तेलाचा त्रास होत आहे. प्रशासनाने लवकर समुद्रकिनारा स्वच्छ करावा अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर एक ते दीड किलोमीटर परिसरात सध्या तेल तवंगाचे गोळे साचले असल्याचे पाहायला मिळत आहे आहे.

हे देखील पहा -

गेल्या दोन महिन्यातील अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर तेल तवंग वाहून येण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अलिबाग तालुक्यातील वरसोली किनाऱ्यावर तेल तवंग वाहून आले होते. चार वर्षात तेल तवंग समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याची ही चौथी घटना आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला मालवाहू जहाजाच्या देखभाल दुरुस्तीची काम करत असतात यानंतर जहाजातील खराब झालेल ऑईल समुद्रात सोडून देतात.

अलिबाग समुद्र किनारा काळवंडला; किनाऱ्यावर दीड किलोमीटर पर्यत तेलाचा तवंग
NCP vs BJP: प्रवीण दरेकर, माफी मागा अन्यथा थोबाड रंगवू: चाकणकरांचा इशारा

हे तेल तवंग गोळ्याच्या रुपाने समुद्र किनाऱ्यांवर वाहून येतात. याचे घातक परिणाम समुद्र किनाऱ्यांवरील गावांना भोगावे लागतात. सागरी प्रदुषणाबरोबरच समुद्र किनारे देखील यामुळे प्रदुषित होतात. त्यामुळे आता अशा प्रकारांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेच आहे. त्यापुर्वी समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेले तेलाचे गोळे तातडीने उचलणे गरजेचे आहे. तेल तवंगामुळे पर्यटकांना किनाऱ्यावर फिरताना त्रास होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com