अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली...

कोर्लई गावाजवळ मातीचा ढिगारा रस्त्यावर...
अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली...
अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली...राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्ह्यात 9 सप्टेंबर पर्यत अतिवृष्टीचा Rain इशारा हवामान विभागाने दिला आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अलिबाग Alibag मुरुड मार्गावर कोर्लई गावाजवळ दरड कोसळली. ही घटना रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर आली आहे. दरड कोसळून Land Slide मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने दोन्ही कडची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरड कोसळण्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक यांनी घटनास्थळी जाऊन दरड काढण्यास सुरुवात केली. मात्र मुसळधार पावसाने अडथळे येत होते. पहाटे पाऊस थांबताच रस्त्यावर पडलेला मातीचा ढिगारा बाजूला केला असून वाहतूक पूर्वरत सूरु झाली आहे.

हे देखील पहा -

दुसरीकडे, दापोलीला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. दापोलीत रात्रभर मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे पाणी भरले आहे. चिपळूणसह परिसरात गेल्या १६ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली...
रायगडात पिटोरी मातेचे घरोघरी उत्साहात पूजन...

रायगड, रत्नागिरी, पुणे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, नंदुरबार, अहमदनगर,धुळे यासह आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. तसेच सातारा, सिंधुदुर्ग, मुंबई या परिसरात पाऊस वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com