Heavy Rain | अलिबाग-रामराज रस्त्यावरील सहाण येथे रस्ता खचला

अलिबाग तालुक्याला गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अलिबाग रामराज मार्गावरील सहाण येथील रस्ता खचला आहे.
Heavy Rain | अलिबाग-रामराज रस्त्यावरील सहाण येथे रस्ता खचला
Heavy Rain | अलिबाग-रामराज रस्त्यावरील सहाण येथे रस्ता खचला राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग तालुक्याला गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पावसाची संततधार दिवसभर सुरू असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अलिबाग रामराज मार्गावरील सहाण येथील रस्ता खचला आहे. हा रस्ता एका कडेने खचला असून वाहतूक मात्र सुरळीत आहे. खचलेल्या रस्त्याच्या बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आले असून नागरिकांनी काळजीपूर्वक प्रवास करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. Alibag-Ramraj road gets damaged at Sahan

हे देखील पहा -

अलिबाग तालुक्यात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे तालुक्यात अनेक भागात पाणी साचले असून रस्त्यावरही पाणी साचले आहे. सतत पडत असलेल्या या पावसाने अलिबाग रामराज रस्त्यावरील सहाण गावाच्या बस स्थानकाजवळ रस्त्याच्या बाजूचा भाग पावसाने खचला आहे.

या रस्त्यावरून जाणारे रामराजमधील शिवसैनिक अमित म्हात्रे यांनी रस्ता खचल्याचे निदर्शनात आल्यावर त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर स्वतः गाडी पाठवून बॅरिकेट्स आणून रस्त्याच्या बाजूला लावले जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये.

Heavy Rain | अलिबाग-रामराज रस्त्यावरील सहाण येथे रस्ता खचला
रायगड मधील राजपुरी येथे दरड कोसळली; ४ घरांचे नुकसान !

रस्ता खचल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना बांधकाम विभागाला केल्या आहेत. या रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत विभागातील नागरिकांनी काळजीपूर्वक प्रवास करावा, असे आवाहनही अमित म्हात्रे यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com