Alibag : अंमली पदार्थ प्राशन करून चोऱ्या करणारे तरुण जेरबंद!

नशेची लागलेली चट, झटपट पैसा कमावून मजेचे आयुष्य जगणाच्या हव्यासापोटी वाम मार्गाला लागलेल्या अलिबागमधील चार तरुणांना जेलची हवा खावी लागली आहे.
Alibag : अंमली पदार्थ प्राशन करून चोऱ्या करणारे तरुण जेरबंद!
Alibag : अंमली पदार्थ प्राशन करून चोऱ्या करणारे तरुण जेरबंद!राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : नशेची लागलेली चट, झटपट पैसा कमावून मजेचे आयुष्य जगणाच्या हव्यासापोटी वाम मार्गाला लागलेल्या अलिबागमधील चार तरुणांना जेलची हवा खावी लागली आहे. अलिबाग, मांडवा आणि पोयनाड हद्दीत चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या चार जणांची टोळी अलिबाग पोलीसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कोरोनानंतर तरुणाई ही वाम मार्गाकडे जात असल्याचे चित्र तयार होऊ लागले आहे.

अलिबाग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण होते. सातत्याने होणाऱ्या या गुन्ह्यांमुळेअलिबाग पोलीसांसमोरही मोठे आव्हान उभे राहीले होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनाही या सर्व गुह्यांच्या तपासावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हे देखील पहा :

यानुसार पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरु केला होता. तांत्रिक तपासाबरोबरच खबऱ्यांकडून माहिती संकलनाचे काम सुरु केले होते. यापुर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील आरोपींची चौकशी सुरु केली होती. अलिबाग पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी माहिती दिली.

या चौकशी दरम्यान शिरवली येथील हर्षल घरत हा २१ वर्षाचा तरुण पोलीसांचा हाती लागला. तो नुकताच चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता. जामिनावर सुटल्यानंतर लगेचच त्याने पुन्हा चोऱ्या आणि घरफोड्या करण्याचे काम सुरु केल्याचे समोर आले. त्यांनी अजून तीन जणांना घेऊन आपली टोळी तयार केली होती. गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून पोलीसांनी हर्षल याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान हर्षल याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली.

त्यानुसार शिरवली येथील साहील चव्हाण वय २०, नारंगी येथील भावेश म्हात्रे वय २० आणि रांजणखार येथील श्रेयस पाटील या तिघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले. चौघाही आरोपींना अंमली पदार्थाचे सेवन करायची सवय लागली होती. अंमली पदार्थ सेवन करून ते चोरी करत होते. पोलिसांनी पकडले तेव्हाही त्यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते.

Alibag : अंमली पदार्थ प्राशन करून चोऱ्या करणारे तरुण जेरबंद!
Vasai : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर!

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चौघांनी अलिबाग परिसरात केलेल्या निरनिराळ्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या. कृष्ण संगम सोसायटीतील फायनान्स कंपनीचे ऑफीस, ओम साई मोटर्स, आदर्श बीअर शॉपी, वाडगाव येथील घरत कलेक्शन, खडताळ पुल येथील हनुमान मंदीर, थळ येथील दत्त मंदीर आणि कुरुळ येथील करण हार्डवेअरची दुकाने या चौघांनी फोडल्याचे कबूल केले.

याशिवाय पोयनाड आणि मांडवा हद्दीत प्रत्येकी दोन गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या तपासात पोलीस निरीक्षक शैलेश सणस, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अनिल सानप, पोलीस हवालदार सचिन शेलार, सुजय मगर, हर्षल पाटील, अनिकेत म्हात्रे यांनी महत्वाची भुमिका बजावली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.