अलिबागचा सचिन पाटील जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व

पत्नीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेत आहे मेहनत; स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविण्याचा सचिनचा निर्धार !
अलिबागचा सचिन पाटील जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व
अलिबागचा सचिन पाटील जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्वराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : एखादे ध्येय साध्य करण्यासाठी अपार मेहनत, कष्ट घेतले की ते लक्ष्य सहज गाठता येते. हे बोलणे जरी सोपं असलं तरी वयोमानानुसार वाढलेल्या शरीराचा परीघ कमी करण्याचे आव्हान पेलून अलिबागचा सुपुत्र सचिन पाटील याने जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत उतरण्यासाठी पिळदार शरीर करून दाखवून दिले आहे. 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या शहरात होत असलेल्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत भारतातील 77 सदस्यीय चमु निवडण्यात आला असून यामध्ये अलिबागचा सुपुत्र सचिन पाटील याचीही अथलेटिक आणि असेंटिक खेळात निवड करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील इतिहासात अलिबागचा सचिन पाटील हा पहिलाच खेळाडू हा शरीर सौष्ठव स्पर्धेत जागतिक स्तरावर आपले कौशल्य दाखविणार आहे. भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून देशाचे राष्ट्रगीत ताश्कंदमध्ये वाजले पाहिजे ही त्याच्या पत्नीची आणि भारतीयांची इच्छा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. या स्पर्धेत बाबत सचिन पाटील याने घेतलेली मेहनत ही वाखण्याजोगी आहे.

हे देखील पहा :

अलिबाग तालुक्यातील वायशेत या गावातील सचिन पाटील हा मूळचा कबड्डी खेळाडू. 2016 सालापासून सचिन हा शरीरसौष्ठव खेळाकडे वळला. त्यावेळी भारतीय संघात स्पोर्ट्स फिजिक्स खेळात त्याची निवड झाली होती. त्यानंतर सचिन याने या खेळापासून फारकत घेऊन स्वतःची डीवाईन जिम स्थापन केली. त्यावेळी पत्नी सानिया हिने पुन्हा सचिनला शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरण्यास सांगितले. मात्र, वाढते वय आणि शरीराचा झालेला डोलारा पाहून पुन्हा हे शक्य नाही असे सचिनने सांगितले. मात्र पत्नीने आग्रह केल्याने सचिनने पुन्हा जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरण्याच्या आणि पत्नीचं स्वप्न पूर्ण करण्याच्या इर्षेने पुन्हा व्यायाम सुरू केला.

सचिन याला आग्रह केल्याने त्याने पुन्हा मेहनतीने व्यायाम सुरू करून पिळदार शरीर यष्टी बनवली. भारतासाठी गोल्ड मेडल मिळवून आपल्या देशाचे राष्ट्रगीत परदेशात वाजले आणि अलिबागसह देशाचे नाव उंचवावे ही त्याची मनोकामना आहे.

अलिबागचा सचिन पाटील जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व
Crime : प्रेमसिंग गिरासे हत्या प्रकरण, मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर

वाढलेले शरीर, पाठीवर झालेल्या गाठी या कोरोनामुळे आर्थिक अडचण अशा अवस्थेत जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकण्याच्या दृष्टीने सचिनने तयारी सुरूकेली. मात्र, यासाठी एका उत्तम प्रशिक्षकाची गरज त्याला होती. तो गुरू त्याला सुनीत जाधव रूपाने भेटला. बॉडी फेडरेशनचे चेतन पाठारे आणि विक्रम रोठे यांनी सुनीत जाधव तुला तयार करू शकतो असे सांगितले. त्यानंतर सुनीत जाधव यांच्याशी संपर्क करून प्रशिक्षण देण्यास सांगितले. सुनीत जाधव हे तयारही झाले. मात्र, दोन महिने सचिनची जिद्द पहिली आणि त्यानंतर सुनीत यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पाठीवर झालेल्या गाठीचे ऑपरेशन करून त्या काढल्या. सराव करताना रक्त येत होते तरीही सचिन याने जिद्द सोडली नाही आणि त्याचे फळ त्याला मिळाले. 12 जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत सचिन हा भारताचे नेतृत्व करणार आहे.

सचिन हा दिवस रात्र या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहे. सकाळी, संध्याकाळी दोन तास कसरत करीत आहे. तर, रात्रीही त्याची कसरत सुरू आहे. त्याच्या या मेहनतीत त्याची पत्नी, कुटूंब, जिमचे सहकारी, सुनीत जाधव, प्रफुल्ल पाटील, केदार लाल हे सहकार्य करीत आहेत. अलिबाग मधून दहा राष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार करण्याचे आणि देशासाठी गोल्ड मेडल मिळविण्याचे सचिन याचे स्वप्नं आहे. सचिनने आतापर्यत 2016 साली महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया, 2017 साली मंगोलिया, साऊथ कोरिया येथील फिसिक्स स्पर्धेत सहभाग घेतला होता.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com