बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!

जिवंत व्यक्तीचा मृत्यू आणि मयत व्यक्तींना जिवंत दाखविण्याचाही महाप्रताप आरोग्य विभागाने केला असल्याने तालुक्यात या भोंगळ कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!
बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!दीपक क्षीरसागर

लातूर : कोरोनाच्या धास्तीने अनेकांचा जीव टांगणीला लागतो याची भीषणता जगाने अनुभवलीय. पण, लातुर (Latur) जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील एका 55 वर्षीय व्यक्तीला चक्क कोरोना (corona) आजाराने मयत दाखवल्याने त्या व्यक्तीसह गावकऱ्यांना धक्का बसला आहे. यामुळे त्या व्यक्तीसह सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हे देखील पहा :

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा कहर मोठा होता. अनेकांनी आप्तस्वकीयांना कायमच गमावलं. या काळात मृतदेहाची विधीवत अंत्यसंस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केले जात होते. याची शासकीय दप्तरी नोंद घेतली जात असे, पण निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील 55 वर्षीय माधव केशव धुमाळ या व्यक्तीचा कोरोना झाला नसताना देखील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मयत दाखवण्याचा महाप्रताप केला आहे. माधव धुमाळ हे शेतकरी असून ते सध्याला शेतात आपली नेहमीची कामे करत आहेत.

बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका करा : चंद्रशेखर आझाद

कोरोनामूळे मयताच्या यादी आपलं नाव कसं आलं याचं आश्चर्य आणि धक्का त्यांनाही बसलाय यात दुरुस्ती व्हावी अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा त्यांनी दिलाय मागील काळातील दुसऱ्या लाटेत अनेक लोकांचा तालुक्यात कोरोना या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागासह तलाठी ग्रामसेवक यांनी गावपातळीवरील गावात कोरोना काळात चांगले काम केल्याने त्यांची वाहवाह झाली. तसेच त्यांना कोरोना योध्दा म्हणून त्यांचा सन्मानही झाला.

बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!
Akola : धक्कादायक; अकरा महिन्यात 128 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या!

परंतु शेडोळ येथील माधव धुमाळ हा व्यक्ती जिवंत असताना त्यांचे 4 मे 2021 या दिवशी कोविड 19 ने मृत्यू झाला म्हणून मयत यादी मध्ये नाव घातले असून सदर व्यक्तीने संबंधिताच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे. सदरील व्यक्तीला मयत दाखविल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा भोंगळ व बेजबाबदार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी होत आहे.

बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!
वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video

याच शेडोळ गावातील धनराज विठ्ठल कांबळे, पद्माकर श्रीपती धुमाळ आणि विष्णू यादव धुमाळ या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांचे मयत यादीमध्ये नावे नाहीत. जिवंत व्यक्तीचा मृत्यू आणि मयत व्यक्तींना जिवंत दाखविण्याचाही महाप्रताप आरोग्य विभागाने केला असल्याने तालुक्यात या भोंगळ कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com