इतर समाजाला आरक्षण दिल्याने आमच्या आरक्षणात काही फरक पडत नाही - लक्ष्मण ढोबळे

मराठा समाज, लिंगायत समाज, धनगर समाज, तसेच मुस्लिम समाज यासर्व समाजांना आरक्षण मिळावे.
इतर समाजाला आरक्षण दिल्याने आमच्या आरक्षणात काही फरक पडत नाही - लक्ष्मण ढोबळे
इतर समाजाला आरक्षण दिल्याने आमच्या आरक्षणात काही फरक पडत नाही - लक्ष्मण ढोबळेप्रदीप भणगे

कल्याण : राजर्षी शाहूमहाराजांनी Shahu Maharaj आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी Dr.Babasaheb Ambedkar त्या वाटेचा महामार्ग केला. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी Maratha Reservation राजाला रस्त्यावर उतरला आहे. अन्य जातींना ज्यामध्ये मराठा समाज, लिंगायत समाज, धनगर समाज, तसेच मुस्लिम समाज यासर्व समाजांना आरक्षण मिळावे. त्यांना आरक्षण दिल्याने आमच्या आरक्षणाच्या वाटय़ात कुठेही फरक पडत नाही अशी भूमिका माजी मंत्री व बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळेLaxman Dhoble यांनी मांडली आहे. All communities should get reservation- Laxman Dhoble

हे देखील पहा-

तसेच ओबीसी ची लिस्ट मागितली ती दिली नाही, त्यामुळे ओबीसी समाजाच नुकसान झालं आहे ,नुकसान याने केलं त्याने केलं अशी ढकला ढकली करण्या पेक्षा ,ओबीसी समाजच सेन्सस केल्यानंतर कुणाच्या नातवाचा सातबारा खराब होतोय हे शोधून काढावं विरोध करण्यापेक्षा असा घणाघात ढोबळे यांनी केला. अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe जन्मशताब्दी निमित्त ढोबळे यांची 50 कार्यकर्त्यांसह 18 जुलैपासून नवनिर्धार संवाद यात्र राज्यभरात सुरु आहे. नंदूबारपासून सुरु झालेल्या या संवाद यात्रे दरम्यान 28 जिल्ह्यातील मातंग वस्त्यांवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या आहे. या यात्रेचा समारोप घाटकोर येथील चिरागनगर येथे 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही यात्र आज कल्याणमध्ये दाखल झाली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com