
CBI Final Report In Dr Narendra Dabholkar Case: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील सरकारी साक्षी, तसेच पुरावे सादर करण्याचे कामकाज संपले असल्याचे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवार (१३, सप्टेंबर) ला याबाबतचा अंतिम अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सादर करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणात बुधवारी (ता.१३) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) साक्षी पुरावे संपल्याबाबतचा अर्ज दाखल केला. त्यामुळे आता आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.
विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात हा अर्ज सादर करण्यात आला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला गोळ्या झाडून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा पुणे पोलिस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि त्यानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.
या गुन्ह्यामध्ये डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. सरकारी पक्षाने साक्षी पुरावे संपल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.