'काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजपमधील मुस्लीमांनी 11 डिसेंबरच्या मोर्चात मुसलमान म्हणून सामील व्हा'

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फक्त मराठा आरक्षणावर बोलतात. मराठ्यांना - धनगरांना आरक्षण द्या पण आमच्या आरक्षणावर ही बोला.'
Muslim
Muslim SaamTV

सोलापूर : MIM चे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी त्यांच्या सोलापूरमधील भाषणामध्ये मुस्लीमांच्या प्रश्नासाठी काम करत असून सर्व मुस्लीमांनी (Muslim) एकत्र यायला हवं असं वक्तव्य केलं. ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले 'काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजपमधील (Congress, NCP, ShivSena, BJP) मुसलमानांना आवाहन करतो कि 11 डिसेंबरच्या मोर्च्यात सर्वांनी पक्ष न बघता केवळ मुसलमान म्हणून सामील व्हा. तसेच शेतकऱ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून मोठा लढा दिला म्हणून केंद्र सरकारला (Central Government) माघार घ्यावी लागली, तशीच ताकद मुस्लीमांच्या प्रश्नांसाठी मुंबईत जमाव लागणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय महाराष्ट्रातून मी एकच मुसलमान खासदार असल्यामुळे मला नेतृत्व करावं लागत असल्याचंही ते म्हणाले.

हे देखील पहा -

शिवाय अमरावतीमध्ये (Amaravati) झालेल्या हिंसेच आम्ही समर्थन करणारं नाही. मात्र 5% रिजर्वेशन (Reservation) मुंबई हायकोर्टन मुसलमानच्या शिक्षणासाठी दिलं पाहिजे अशा सूचना दिल्या, त्यावेळी शिवसेना - भाजपच सरकार होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फक्त मराठा आरक्षणावर बोलतात. मराठ्यांना - धनगरांना आरक्षण द्या पण आमच्या आरक्षणावर ही बोला महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर त्यांनी मुस्लिम आरक्षणावर बोलणं बंद केल. 93 हजार एकर वक्फ बोर्डाच्या जमिनीच काय झालं, त्या आम्ही मिळवू असं देखील ते भाषणात म्हणाले.

Muslim
सरकारने परवानगी दिली नाही तरी, मुंबईला येणारच; MIM खा.इम्तियाज जलील यांचा इशारा

काँग्रेसला 'तो' आनंद साजरा करण्याचा अधिकार नाही -

तुम्ही मुस्लीम खासदार निवडून द्या मी बाजूला होतो अमरावती, नांदेड मध्ये जे झालं त्याचा निषेध करतो, मात्र भाजपाने दुसऱ्या दिवशी जे केल ते आपल्या देशाची संस्कृती सांगत नाही. बॅ. ओवेसींनी आज महाराष्ट्राच्या MIM अध्यक्ष पदाचा राजीनामा द्या म्हणून सांगितलं तर आज देतो, मात्र मीपणा करणारा चालणार नाही असही ते यावेळी म्हणाले. 28 दिवसांपासून काँग्रेस भवनासमोर (Congress Bhavan) शेतकरी आंदोलन करतायत त्या काँग्रेसला शेतकरी आंदोलन (Farmer Protest) मागे घेतले म्हणून आनंद साजरा करण्याचा अधिकार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेने बरोबर लग्न केल. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सत्तेची तीन चाकी रिक्षा चालवत असल्याची टीका ही जलील यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com