Alternanthera Sessilis : शेतीच्या बांधावर काँग्रेस गवताच्या जागी भाजप गवत फोफावलं; शेतकरी वैतागले

शेतीच्या बांधावर भाजप गवत फोफावल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय
File Photo
File PhotoSaam Tv

सचिन बनसोडे

Maharashtra Farmers News : सध्या शेतीमधील एका गवताने शेतकऱ्यांना चांगलाच त्रास दिला आहे. अनेक वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेस गवत फोफावत होते. मात्र, कालांतराने काँग्रेस गवत नामशेष होत चालले आहे. असं असतानाच आता महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजप गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. शेतीच्या बांधावर भाजप गवत फोफावल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. (Latest Marathi News)

File Photo
Special News : अंगठेबहाद्दर शेतकरी घेतोय ६ लाखांचे उत्पन्न; सातपुड्याच्या कुशीत फुलवली स्ट्रॉबेरी शेती

भाजप गवताला चुबुक काटा असेही म्हणतात गवताला काटेदार फुले येतात. त्यामुळे त्याला उपटून काढण्यासाठी मोठा त्रास होतो. हे गवत जमिनीवर वेलासारखे पसरते या गवतामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होते.

या गवताला जाळून अथवा त्याच्यावर औषध फवारणी केली तरी या गवताचा नाश होत नाही. त्यामुळे हे गवत शेतीला (Farm) धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आधी काँग्रेस गवताने आधी त्रास दिला, आता भाजप गवत त्रास देत असल्याचे शेतकरी सांगतात.

या गवताला भाजप गवत हे नाव का पडले हे कोणी सांगू शकत नाही. मात्र, मराठवाडा भागात हे नाव प्रचलित झाल्या नंतर हे नाव आता पश्चिम महाराष्ट्रात रुजू लागले आहे. मात्र, हे गवत परदेशी गवत आहे. अल्टरनेनथेरा चेसेलिज असं शास्त्रीय नावाने या गवताला परदेशात ओळखले जाते. मात्र, भारतात या गवताला भाजप गवत हे नाव पडलं आहे. जवळपास ८०च्या दशकात हे गवत भारतात आल्याचा अंदाज आहे.

देशात भाजपचा प्रसार आणि या नव्या गवताचा प्रसार समकालीन असल्याने याला भाजप गवत असं नाव पडलं. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकरी या गवताला भाजप गवत याच नावाने ओळखतात. शेतीच्या बांधावर, शेतात आणि मोकळ्या जागेवर या गवताची वाढ होते.

अनेक वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेस गवत दिसायचे हे गवत निरुपयोगी आणि कडू असल्याने या गवताचा शेतकऱ्यांना फार त्रास होत होता कालांतराने काँग्रेस गवत नामशेष होत चालले असून आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रत भाजप गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. शेतीच्या बांधावर भाजप गवत फोफावल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

अहमदनगर जिल्ह्यासह, बीड, जिल्ह्यात शेतीच्या बांधावर तसेच थेट शेतातच या गवताचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या गवताच्या वाढीचा वेग जास्त आहे. काँग्रेस गवत आणि भाजप गवत यात कमालीचा फरक आहे. काँग्रेस गवत कमी होऊन भाजप गवत वाढले असल्याचे काही शेतकऱ्यांचे (Farmers) म्हणणे आहे.

File Photo
CM Shinde : मुलांनी जमीन केली परस्पर स्वतःच्या नावे ; शेतकरी आजोबांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

हे गवत नामशेष होत नाही मात्र या गवताला रोखण्यासाठी आणि वाढ होण्यापासून आळा घालायचा असेल, तर गवत कोवळे असेल तेव्हाच उपटून टाकले. तर या गवताचा त्रास होणार नाही. मात्र, हे गवत एकदा फोफावले तर मात्र शेतीचे फार मोठे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com