सरकारने परवानगी दिली नाही तरी, मुंबईला येणारच; MIM खा.इम्तियाज जलील यांचा इशारा

विना परवानगी भाजपा नागपूरात मोर्चा काढते, अजित पवार मोठमोठ्या सभा घेतात त्यावेळेस कोरोना कुठे जातो?
सरकारने परवानगी दिली नाही तरी, मुंबईला येणारच; MIM खा.इम्तियाज जलील यांचा इशारा
imtiaz jalil SaamTV

सोलापूर : आज सोलापूर मध्ये MIM चे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) यांनी त्यांच्या भाषणामध्ये महाविकास आघाडीसह भाजपवरती निशाना साधला आहे. तसेच 'सोलापुरात असा कोणता ज्ञानी आहे; जो म्हणतोय की कोरोना आहे, असं विधान देखील त्यांनी यावेळी केलं. त्यांच्या सभेला प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी प्रशासनावर देखील टीका केली.

हे देखील पहा -

ते आपल्या भाषणात म्हणाले ' आम्हाला खुल्या मैदानात सभा घ्यायला परवानगी दिली असती तर कोरोनाचे नियम पाळून (Corona rules) आम्ही लांब लांब बसलो असतो, जे कोरोनाबद्दल ज्ञान देतात ते रोज रात्री कोरोनाशी वार्तालाभ करतात का? असं वक्तव्य देखील त्यांनी भाषणात केलं. तसेच महाराष्ट्रातील सरकार तीन पायावर चालत आहे त्यामुळे त्यांचं ज्ञान किती असेल याची अनुमती येते असा सरकारला टोला लगावत, येत्या महापालिका निवडणुकीत दाखवून द्या. बॅ. असदुद्दीन ओविसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर औरंगाबादची (Aurangabad) जनता जास्त प्रेम करते की सोलापूरची(Solapur); तसेच सोलापूर चा माहोल बदलणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

imtiaz jalil
समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूचं!

कोरोना हा आमच्याच मागे का लागलाय; आमच्या मोर्चाना परवानगी मिळतं नाही. मात्र ज्यांची सत्ता आहे, ज्यांचा मुख्यमंत्री आहे. ते महागाईच्या मुद्द्यावर मोर्चा काढतात, विना परवानगी भाजपा (BJP) नागपूरात मोर्चा काढते, अजित पवार (Ajit Pawar) मोठमोठ्या सभा घेतात त्यावेळेस कोरोना कुठे जातो? असा सवाल उपस्थित करतच आपण 27 नोव्हेंबर ला 'चलो मुंबई'चा नारा दिला त्याला कोरोनामुळे परवानगी दिली नाही. मात्र आता 'चलो मुंबई' हा नारा नसेल तर 11 डिसेंबरला 'मुंबई तो हम आयेंगे' हा नारा असेल आणि सर्वांच्या गाड्यांवरती MIM चे कार्यकर्ते तिरंगा झेंडा घेऊन फडकावत मुंबईला येणार, त्यामुळे परवानगी दिली तरी येणार आणि नाही दिली तरी येत्या 11 डिसेंबरला मुंबईला येणार असा जाहिर इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com